लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहण्याची संधी मिळाली तर सोडु नका, असंख्य कार्यकर्त्यांची भावना माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या पर्यंत पोहचली.

करमाळा प्रतिनिधी
अलीम शेख
मोबाईल नंबर 98 50 68 63 60
लोकसभा निवडणुकीत उभे राहण्याची संधी मिळाली तर ती सोडु नका अशी असंख्य कार्यकर्त्यांची भावना माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या पर्यंत पोहचली असुन अनेकांनी फोन वरुन तर काहींनी माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपले मत मांडल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना तळेकर यांनी सांगितले की काल दिवसभरात माढा लोकसभा मतदारसंघात माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या नावाची चर्चा झाली असुन सोशल मीडिया वर यावर अनेकांनी याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी जनतेचा कौल लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा असे मत अनेकांनी मांडले. तर पाटील गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री उशीरापर्यंत नारायण (आबा) पाटील यांची भेट घेऊन आपले मत मांडले. माढा लोकसभा मतदार संघात बदलाचे संकेत आता जनतेकडून मिळू लागले असून माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी येत्या काही दिवसात आपला योग्य तो निर्णय घ्यावा तसेच जर लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणुन उभे राहण्याची संधी मिळाली तर ती अजिबात सोडू नये असे रोखठोक मत अनेक कार्यकर्त्यांनी नोंदवले. माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांचेकडे सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आणि विकासाची दृष्टी असल्याने आता मतदारांनी आपल्या भावना सोशल मीडिया द्वारे व्यक्त केल्या आहेत. माढा मतदार संघातील राजकीय घडामोडींना आता वरीष्ठ पातळीवर वेग आला असून येत्या दोन दिवसांत अनेक महत्वाच्या बैठकीस हजर राहण्याचे आमंत्रण माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांना दिले गेले आहे. तसेच काही वरीष्ठ नेतृत्वांकडून प्रत्यक्ष भेटीसाठी बोलावले गेले आहे. माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या पाठीमागे एकगठ्ठा मतदान असून माढा लोकसभा मतदारसंघात त्यांची भुमीका निर्णायक ठरणार असल्याने पाटील यांच्या नावाची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. प्रत्यक्ष उमेदवार म्हणुन निवडणुक लढवायची की पक्ष प्रवेश करुन विधानसभेसाठी सज्ज राहवयाचे याबाबत स्वतः माजी आमदार नारायण (आबा) पाटील हे निर्णय घेणार असुन सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचे तळेकर यांनी ठामपणे सांगितले.



