शहर

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड महाराष्ट्र विद्युत मंडळ सहाय्यक अभियंता अँटी करप्शन ब्युरो पालघर पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या जाळ्यात अटक

टाईम्स 9मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

नवीन मीटर कनेक्शन मंजुरी देण्यासाठी आठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तिचा स्वीकार करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथील महावितरण विद्युत विभाग सहाय्यक अभियंता संदीप जवाहर याला सोमवारी रात्री अँटी करप्शन ब्युरो पालघर विभाग पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने रंगेहात अटक करून त्यांच्यावर विक्रमगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

विक्रमगड येथील तक्रारदार यांनी त्यांच्या वडिलांच्या नावे दोन नवीन मीटर साठी विक्रमगड महाराष्ट्र विद्युत मंडळाकडे लेखी अर्ज दाखल केला होता. याबाबत संबंधित विभाग वायरमन यांनी पाहणी करून अहवाल दिल्यावर याबाबत कार्यवाही करून या दोन नवीन मीटर साठी मंजुरी देण्याकरिता महाराष्ट्र विद्युत मंडळ विक्रमगड सहाय्यक अभियंता संदीप जवाहर यांनी तक्रारदार यांच्याकडे आठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

याबाबत या अभियंत्याची लेखी तक्रार तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो पालघर विभाग पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या कार्यालयात केली होती. याबाबत सत्यता पडताळणी करून अँटी करप्शन ब्युरो पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर विभाग पोलीस अधीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने सोमवार दिनांक 22 जुलै 2024 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सापळा रचून महाराष्ट्र विद्युत मंडळ विक्रमगड सहाय्यक अभियंता यांना तक्रारदार यांच्याकडून आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करून विक्रमगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याआधी देखील त्यांच्यावर चंद्रपूर जिल्ह्यातील चडचंद्रपूर पोलीस ठाण्यात लाच स्वीकारल्याचा गुन्हा दाखल आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button