शहर

सवादे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री.विनोद डोहाळे पालघर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

विक्रमगड ( प्रतिनिधी ): राजेंद्र भगवान भोईर
(मो.९२०९८६९८३०)

सवादे जिल्हा परिषद शाळेतील पदवीधर शिक्षक विनोद डोहाळे यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके,पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषद पालघर आयोजित शिक्षक दिन कार्यक्रम जिल्हा नियोजन समिती सभागृह (215),जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथील कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आले.

डोहाळे यांनी विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सवादे येथे राबविण्यात आलेल्या शाळा बंद शिक्षण सुरू, शालेय विद्यार्थी परसबाग,विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शाळेत सुरू असलेले अध्ययन अध्यापन विषयक उपक्रम, विद्यार्थ्यास संगणक प्रशिक्षण कार्यक्रम, विद्यार्थी पालक किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन व उपयोगी साहित्य वाटप, विद्यार्थिनी व महिला शिक्षिका यांच्यासाठी स्वतंत्र विश्रांतीगृह, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, पाढे पाठांतर उपक्रम, हस्ताक्षर सुधार उपक्रम यांसारखे शाळा विविध प्रकारचे विशेष गुणवत्तापूर्ण शिक्षण विषयक राबवत असलेल्या सर्व उपक्रमांची दखल घेऊन जिल्हा परिषद निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश पात्रता परीक्षा, जिल्हास्तर खो-खो स्पर्धा, विद्यार्थी हस्ताक्षर सुधार उपक्रम, कोरोना प्रादुर्भाव नंतर शाळेने राबविलेला आगळा वेगळा विद्यार्थी शाळा प्रवेशोत्सव या आणि अशा अनेक नाविन्यपूर्ण व वैविध्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यास अध्यक्ष प्रकाश निकम,उपाध्यक्ष पंकज कोरे,बांधकाम सभापती संदेश ढोणे कृषी सभापती संदीप पावडे,महिला व बालकल्याण सभापती रोहिणी शेलार,मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, शिक्षणाधिकारी प्राथमिक शेषराव बढे, शिक्षणाधिकारी माध्यमिक संगिता भागवत,विक्रमगड पंचायत समिती सभापती यशवंत कनोजा,उपसभापती विनोद भोईर,विस्तार अधिकारी शंकर हडबाळ, डोल्हारी बुद्रुक ग्रामस्थ व पालक, सवादे ग्रामस्थ व पालक शिक्षकवृंद उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button