विशेष

संत रोहिदास महाराजाची ६४७ वी जयंती, संत रोहिदास समाज उन्नती मंडळ तर्फे उत्साहात साजरी

ठाणे प्रतिनिधी

राजेंद्र भगवान भोईर(मो.9028305319)

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील संत रोहिदास नगर येथे संत रोहिदास समाज उन्नती मंडळ, विक्रमगड तर्फे संत रोहिदास महाराजाची ६४७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी संत रोहिदास महाराजाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची शिकवण देणारे महान संत रोहिदास (रविदास ) महाराज यांची शनिवारी जयंती असुन, संत रोहिदास यांना महाराष्ट्रात संत रोहिदास म्हणून ओळखले जाते. जाती -पातीच्या भिंती कोसळून एकमेकांतप्रती प्रेम व आदरभाव निर्माण व्हावा, या महान विचारसरणीचा संत रोहिदास महाराजांनी भक्तिमार्गाने देशभरात प्रचार आणि प्रसार करून देशाला सामाजिक व आध्यात्मिक उंचीवर नेऊन पोहोचवले आहे.

गुरु संत रोहिदास जयंती हिंदू पंचांगनुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी देशभरात मोठया उत्साहात साजरी करण्यात येते. संत रोहिदास महाराज यांची ही ६४७ वी जयंती आहे. या कार्यक्रमाला नगरसेविका सौ.चंद्रशीला भडांगे, नगरसेवक श्री. अमोल भडांगे, मंडळाचे अध्यक्ष श्री. संजय भोईर, उपाध्यक्ष श्री. वसंत वाघचौरे, सल्लागार श्री.भगवान भोईर, तसेच सर्व मंडळाचे सदस्य, संत रोहिदास नगरातील महिला व जेष्ठ नागरिक या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button