महाराष्ट्र

शिवजयंती व समाजसेवक कै. निवृत्तीराव नामदेवराव गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, मोफत औषधोपचार शिबिर व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न…

टाइम्स 9 मराठी न्युज

अकलूज..आज दि. 19 फेब्रुवारी 2023 रोजी आनंदनगर अकलूज ता.माळशिरस येथे द्वारकाधीश सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबिराचा 678 रुग्णांनी लाभ घेतला तर 92 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

शिबिराचे उद्घाटन सोलापूर जिल्हा परिषदेच्या मा.सदस्या कु. स्वरूपा राणी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे भाजपा किसान किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर,भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुक्तार भाई कोरबु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह सचिन शिंदे, भाजपा ओबीसी मोर्चाचे मा. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे ,भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.नागनाथ दगडे पाटील, अकलूजचे मा.सरपंच किशोरसिंह माने पाटील, प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. विक्रमसिंह मगर, भाजपा माळशिरस तालुका संघटन सचिव संजय देशमुख, मुख्यमंत्री सहायता कक्षाचे माळशिरस तालुका प्रमुख रणजित गायकवाड,हृदय रोग तज्ञ डॉ.श्रीकांत हेगडे , नेत्र तज्ञ डॉ.अप्पासाहेब टेळे , होमिओपॅथी तज्ञ डॉ.ज्ञानेश्वर पवार,डॉ.सपना गांधी, डॉ. संदिप महामुनी, डॉ. जयंत शिंदे, होमिओपॅथी संघटनेचे जिल्हा सदस्य डॉ. विठ्ठल कवितके,डॉ. शिवाजीराव काळे ,डॉ.योगेश घोगरे पाटील, डॉ.सुनिल गांधी,डॉ.अनिल बळते, निमाचे डॉ.तानाजीराव कदम, डॉ.शिरीष रणवरे ,डॉ. तात्यासाहेब माने ,डॉ. प्रशांत पाटील, डॉ. अनिस शेख,डॉ.भगवंत भोसले ,महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे सदस्य डॉ. बाळकृष्ण गायकवाड, डॉ.पांडुरंग गायकवाड, डॉ. मिनाक्षी गायकवाड, मिशन आयुर्वेदचे डॉ.हर्षवर्धन गायकवाड,डॉ.प्रदिप जगदाळे डॉ. पृथ्वीराज यादव, डॉ. बबन ताम्हाणे, डॉ. नितीन कुबेर, डॉ.विजयकुमार निलटे, डॉ.किशोर पिसाळ, डॉ. अक्षय वाईकर, ग्रामविकास अधिकारी नितीन शेलार, रोटरी क्लब सराठी डीलाईटच्या अध्यक्षा स्वाती चंकेश्वरा,अमोलिका जामदार, माळशिरस तालुका केमिस्ट असोसिएशनचे सचिव आप्पासो शेंडगे,सदस्य शंकर पवार, विजय जगताप, प्रदीप भोरे, बाळासो जाधव, रवि जगताप, अमरसिंह गायकवाड, गिरझनी ग्राम पंचायत सदस्य सचिन गायकवाड, राहुल गायकवाड, राकेश गायकवाड इ.उपस्थित होते..

प्रास्ताविकात द्वारकाधीश सेवाभावी संस्थेचे डॉ. बाळकृष्ण गायकवाड यांनी द्वारकाधीश सेवाभावी संस्थेने बावीस वर्षे अविरतपणे समाजाची सेवा केलेली असून यामध्ये मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन, रक्तदान शिबिरे ,कोरोना काळात गोरगरीब जनतेसाठी मोफत कोविड केअर सेंटर, गोरगरिबांना शिधावाटप, “मदत नव्हे…कर्तव्य “भावनेतून लागेल त्याला मदत आजपर्यंत सेवाभावी संस्थेच्या वतीने केली असून यापुढेही हे कार्य अविरतपणे चालू राहील असे सांगत आलेल्या सर्वांचे स्वागत केले..

उद्घाटनपर भाषणात सोलापूर जिल्हा परिषदेच्या मा.सदस्या कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांनी बावीस वर्षे द्वारकाधीश सेवाभावी संस्थेने मोफत औषधोपचार शिबीराचे आयोजन करून द्वारकाधीश सेवाभावी संस्थेने खऱ्या अर्थाने समाजाची सेवा केलेली असून त्यांनी भविष्यात अशीच सेवा करावी असे सांगत फक्त जयंती किंवा पुण्यतिथी साजऱ्या न करता त्यांचे विचार अमलात आणण्याचे काम केले असल्याचे सांगितले.

शिवव्याख्याते प्रा. विक्रमसिंह मगर यांनी छत्रपतींच्या शिवचरित्रानुसार जगले पाहिजे असे सांगत द्वारकाधीश सेवाभावी संस्था ही खरोखर शिवचरित्रानुसार काम करत असल्याचे सांगून त्यांनी केलेले उपक्रम हे खरोखरच कौतुकास्पद असून यातूनच खरोखर समाजाची सेवा घडत असल्याचे सांगितले.

जयंतीनिमित्त शालेय क्रिडा स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,हस्ता‌क्षर स्पर्धा यामध्ये जिल्हा परिषद शाळा,आनंदनगर व बोरावके वस्ती येथील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व शिवविचार पुस्तके देवून गौरविण्यात आले.
आनंदनगर शाळेचे केंद्र प्रमूख संतोष कोले,जिल्हा परिषद शाळा, बोरावके वस्तीचे मुख्याध्यापक तात्याराम कुंभार यांना उत्कृष्ट मतदान केंद्र स्थरिय अधिकारी म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच शिक्षक श्रीमती संगीता देशमुख, प्रेमला कुंभार, रेश्मा अंधारे, रेखा कोळी, मल्लिकार्जुन गुमे, संगीत विशारद पाटे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन आनंदनगरचे मा.उपसरपंच वसंतराव गायकवाड व मा. सरपंच वसंतराव जाधव यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी द्वारकाधीश सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, आनंदनगर ग्रामपंचायत सदस्य प्रा.राजेंद्र जाधव, बाळकृष्ण काटकर, राजेंद्र सोनवणे, सतिश कुंभार, गोरख गवळी,मा.उपसरपंच बाळकृष्ण जरे, दादासाहेब जाधव,प्रा.अविनाश जाधव,प्रा. राजेंद्र जगदाळे,सागर जाधव ,संजय शिंदे, बाळासाहेब शिंदे, दिलीप यादव, अक्षय शेंडगे,दादासाहेब यादव,बाळकृष्ण डमरे,दिगांबरतात्या नायकुडे ,दादासाहेब कांबळे, विश्वनाथ निकम,रमजान मुलाणी,दिपक भांगे, चैतन्य यादव, गणेश यादव, पृथ्वीराज सोनवणे, उमेश चव्हाण, विष्णू गायकवाड,प्रशांत शेळमकर, उमेश जगदाळे,चांगदेव भांगे,आनंदनगर विकास सोसायटीचे संचालक आण्णासो कदम,डॉ.प्रफुल्ल गायकवाड , डॉ.धनाजी यादव, संतोष क्षिरसागर, जय गटकल, सौदागर काटकर, प्रवीण जगदाळे,अनिल कदम आणि पोलीस पाटील सुनिल म्हेत्रे यांनी प्रयत्न केले.
यावेळी पत्रकार निनाद पाटील, गणेश जाधव,कृष्णा लावंड, नौशाद मुलाणी उपस्थीत होते.
सूत्रसंचलन निलेश आडत तर आभार डॉ. हर्षवर्धन गायकवाड यांनी मानले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button