शहर

ठाणे महानगरपालिकेच्या लिपिकासह खाजगी इसम साडेआठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस निरीक्षक विलास मते यांच्या जाळ्यात अटक

टाईम्स नाईन न्यूज मराठी चॅनल
उपसंपादक विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत.

मुलाच्या नावाने नव्याने घेतलेल्या फ्लॅटचे टॅक्स पावतीवरील नावात बदल करून मालमत्ता हस्तांतरण नोंद करण्याकरिता कौसा दिवा उपप्रभाग कार्यालय ठाणे महानगरपालिकेच्या गिरीप रतन अहिरे वय वर्ष (53) या लिपिकाच्या सांगण्यावरून खाजगी इसम असीम इनायत शरीफ वय वर्ष (51) यांनी (65) वर्षीय तक्रारदार यांच्याकडे मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी 9 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी या लिपिकाची व खाजगी इसमाची लेखी तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे कार्यालयात केली होती.

या तक्रारीची पडताळणी करून श्री. सुनील लोखंडे पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र व श्री. अनिल घेरडीकर अप्पर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे पोलीस निरीक्षक विलास मते, पोलीस हवालदार मोरे, पोलीस हवालदार कोळी,पोलीस हवालदार लोटेकर, पोलीस नाईक पोटे, महिला पोलीस शिपाई राजपूत,चालक शिपाई बर्गे या पथकाने मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3 वाजता सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लिपिक गिरीप अहिरे यांच्या सांगण्यावरून खाजगी इसम असीम शरीफ यांनी तडजोडीची साडे आठ हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी त्याला रंगेहात अटक करून या दोघांवर मंगळवारी संध्याकाळी मुंब्रा ठाणे शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button