हर्बालाइफ इंडियाने अधिकृत उत्पादनाची माहिती आणि खरेदी यासाठी जाहीर केले अधिकृत चॅनेल

नुकत्याच दिलेल्या निवेदनात, कंपनीने भारतातील अस्सल हर्बालाइफ उत्पादने अधिकृत स्वतंत्र सहका-्यांद्वारे खरेदी करण्याच्या गरजेवर भर दिला.
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
हर्बालाइफ इंडिया, एक अग्रगण्य पोषण आणि वेलनेस कंपनी असून तिने ग्राहकांना त्यांच्या उत्पादनांबद्दल अनधिकृत विक्री आणि दिशाभूल करणारी माहिती यांच्या वाढत्या आव्हानाबद्दल सावध केले आहे. कंपनी पुनरुच्चार करते की अस्सल हर्बालाइफ उत्पादने खरेदी करण्याचा एकमेव अस्सल मार्ग म्हणजे स्वतंत्र सहकाऱ्यांच्या नेटवर्कद्वारे.हर्बालाइफ उत्पादने भारतात आणि इतर ९४ देशांमध्ये केवळ स्वतंत्र सहकाऱ्यांच्या नेटवर्कद्वारे उपलब्ध आहेत. त्याच्या डायरेक्ट सेलिंग बिझनेस मॉडेलद्वारे, हर्बालाइफचा उद्देश ग्राहकांना विज्ञान समर्थित उत्पादने आणि स्वतंत्र सहकाऱ्यांच्या नेटवर्कमधून वैयक्तिक समर्थन आँफर करणे हा आहे जेणेकरून त्यांना त्यांची निरोगी उद्दिष्टे साध्य करण्यात मदत होईल.”

“हर्बालाइफ स्वतंत्र सहकाऱ्यां”चा उल्लेख करणाऱ्या किंवा हर्बालाइफचा पत्ता प्रदर्शित करणाऱ्या किंवा हर्बालाइफ वेबसाइट सारख्याच किंवा फसव्या रीतीने तशीच माहिती देणाऱ्यापासून किंवा अनधिकृत वेबसाइटवर विकल्या जाणाऱ्या उत्पादनांपासून सावध राहण्याचा सल्ला ग्राहकांना दिला जातो. कंपनी आपल्या ग्राहकांना हर्बालाइफ आणि तिच्या उत्पादनांबद्दल अनधिकृत प्रशिक्षण, सेवा आणि दिशाभूल करणारी माहिती याबद्दल चेतावणी देते. सादर केलेल्या माहितीच्या अचूकतेसाठी आणि कोणत्याही ई कामर्स चँनेलवर /वेबसाइटवर विकल्या जाणाऱ्या उत्पादनांच्या सत्यतेसाठी हर्बालाइफ इंडिया आदरपूर्वक कोणतीही जबाबदारी घेत नाही.” असे हर्बालाइफ यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
कंपनी बद्दल
हर्बालाइफ (NYSE: HLF) ही एक प्रमुख आरोग्य आणि वेलनेस कंपनी आणि समुदाय आहे जी १९८० पासून उत्तम पोषण उत्पादनांसह लोकांचे जीवन बदलत आहे आणि त्यांच्या स्वतंत्र वितरकांसाठी एक व्यवसाय संधी देत आहे. कंपनी उद्योजक वितरकांच्या माध्यमातून ९५ बाजारपेठेतील ग्राहकांना विज्ञान समर्थित उत्पादने आफर करते. जी त्यांच्या ग्राहकांना त्यांचे सर्वोत्तम जीवन जगण्यासाठी एक निरोगी, अधिक सक्रिय जीवनशैली स्वीकारण्यास प्रेरित करणारे एकास एक कोचिंग आणि सहाय्यक समुदाय प्रदान करतात.



