मोखाडा महाविद्यालयात ‘मेरी माटी मेरा देश’अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद..

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियानाला बुधवार दिनांक 9 ऑगस्ट ते मंगळवार दिनांक 15 ऑगस्ट 2023 पासून सुरुवात झाली आहे.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार या अभियाना उपक्रमाअंतर्गत लोकनेते रामशेठ ठाकूर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मोखाडा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. डी. भोर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पंचप्रण शपथ’ हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांगताना राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. एस. आर. व्हंडे यांनी पंचप्रण ही संकल्पना सर्वांना समजावून सांगताना त्यातील पाचप्रण कशासाठी आहेत. त्याचबरोबर ‘मेरी माती मेरा देश’ या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश उपस्थितांना सांगितला त्यानंतर विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी ‘पंचप्रण शपथ’ घेतली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. ई. सैंदनशिव यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.



