सामाजिक

सफाळे विळंगी ग्रामपंचायत हद्दीत दोन दिवसीय नागरी सुविधा शिबिर संपन्न

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

पालघर जिल्हा प्रतिनिधी

विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

केंद्र सरकारच्या सुविधा व योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा या उद्देशाने पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील विळंगी ग्रामपंचायतीच्या वतीने विळंगी ग्रामपंचायत कार्यालयात दोन दिवसीय नागरी सुविधा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार दिनांक 9 मार्च ते रविवार दिनांक 10 मार्च 2024 या कालावधीत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये विळंगी ग्रामपंचायत हद्दीतील 370 ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या ग्रामस्थांना केंद्र सरकारच्या योजना व सुविधांचे महत्व पटवून देऊन त्यांचा बँकेची संबंधित सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत व सुरक्षित हवा या उद्देशाने त्यांचे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करून देऊन त्यांना आरोग्याचा खर्च कमी करण्यासाठी आभा कार्ड व आयुष्यमान कार्ड सह असंघटित क्षेत्रात आर्थिक सुरक्षितता मिळावी या उद्देशाने त्यांना ई-श्रम कार्ड देखील या शिबिराच्या माध्यमातून विनामूल्य काढून देण्यात आले यावेळी या शिबिराला विळंगी गावच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला सरपंच सुमिता गिरीश घरत, व उपसरपंच तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालघर उपतालुका अध्यक्ष चेतन पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व या गावातील मान्यवर व्यक्तींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button