शहर

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या म.वा.देसाई मालाड रुग्णालयातील रुग्णांना अग्रोहा विकास ट्रस्ट महिला समितीच्या वतीने फळे व अल्पोपहार वाटप

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक: 7030516640

मुंबई मालाड येथील अग्रोहा विकास ट्रस्ट महिला समिती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक 44 यांच्या वतीने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालाड पूर्व गोविंद नगर येथील मनोहर वामन देसाई रुग्णालयातील रुग्णांना सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी फळे आणि अल्पोपहार वाटप करण्यात आला

यावेळी मालाड पूर्व अग्रोहा विकास ट्रस्ट समितीच्या महिला कार्यकर्त्या अनिता देवडा , अलका अग्रवाल, रंजना धानुका,बिंदू सराफ,,रितू परसरामपुरिया, गुंजन फतेपुरिया, ज्योती गुप्ता, अर्चना तिबडेवाल दिपाली अग्रवाल व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालाड पूर्व शाखा क्रमांक 44 कार्यालयाचे प्रमुख राजू नाथा गायके उपस्थित होते.

अग्रोहा विकास ट्रस्ट महिला समितीच्या अध्यक्ष रीना सिंघानिया आणि सचिव रिचा झुरिया यांच्या मार्गदर्शनाखाली ही महिला समिती मालाड भागातील रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना गेल्या अनेक वर्षापासून फळे व अल्पोपहार वाटप करण्याचे काम करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button