शहर

पालघर जिल्ह्यातील गांजे गावातील पाच वर्षीय बालकाचा सर्प दंशाने मृत्यू… वर्षभरात 2519 जणांना सर्पदंश… अनेकांचा उपचारा अभावी मृत्यू

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

पालघर जिल्ह्यातील एका पाच वर्षीय बालकाचा सर्प दंशाने मृत्यू झाला आहे.मयंक पांडुरंग कालेकर असे या मृत बालकाचे नाव आहे.तो पालघर जिल्ह्यातील गांजे केळीचा पाडा येथील त्याच्या घराच्या अंगणात खेळत असताना त्याला काहीतरी चावल्या बाबतची माहिती त्याने आपल्या वडिलांना दिल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला उपचारासाठी मनोर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता योग्य उपचार न केल्यामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी या रुग्णालयातील डॉक्टरांवर केला आहे.

आतापर्यंत वर्षभरात पालघर जिल्ह्यातील जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालयात 2519 जणांना सर्पदंश झाल्याची नोंद करण्यात आली असून यापैकी अनेक जणांचा योग्य उपचार न मिळाल्यामुळे रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button