कृषी पर्यवेक्षक भारत शेंडे याला लाच घेताना पकडले करमाळा येथील घटना

करमाळा प्रतिनिधी अलिम शेख
करमाळा शहरात दहा हजार रुपयाची लाच घेताना करमाळा कृषी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक भारत शेंडे यांना आज रंगेहात पकडण्यात आली आहे
याबाबतची माहिती अशी की तक्रारदार व्यक्तीच्या पत्नीच्या नावे शासनाच्या महाडीबीटी या पोर्टलवर अनुदानावर पॉवर टिलर मिळवण्यासाठी अर्ज केला होता त्याबाबत तक्रारदार यांना पूर्व संमती मिळाली त्यानंतर त्यांनी पावर टिलर खरेदी करून सर्व कागदपत्रे लोड केली

परंतु पडताळणी रिपोर्ट हा कृषी पर्यवेक्षक भारत शेंडे यांनी द्यावयाचा होता परंतु त्यांनी तो रिपोर्ट दिला नाही सदरचा रिपोर्ट देण्यासाठी दहा हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले त्यामुळे तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती त्यानंतर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश कुंभार पर्यवेक्षण अधिकारी यांच्यासह सापळा रचून प्रमुख पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी यांनी करमाळा सापळा लावला त्यानुसार तक्रार दाराकडून दहा हजार रुपये घेताना कृषी पर्यवेक्षक भारत शेंडे यास लासलुजपत प्रतिबंधक विभागाने रंगीहात पकडले या कामे करमाळा पोलिसात गुन्हा दाखल केला जात आहे याप्रकरणी पोलीस हवालदार प्रमोद पकाले पोलीस कॉन्स्टेबल गजानन किनगी चालक पोलीस हवालदार राहुल गायकवाड यांनी या कारवाईस भाग घेतला होत



