इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीसाठी १४ जागांसाठी ३४ उमेदवार, चार मतदार संघातील जागा बिनविरोध

इंदापूर प्रतिनिधी एस. बी. तांबोळी,
मोबाईल – 378081147
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीसाठी १४ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात. तर उमेदवारी अर्ज माघार घ्यायच्या शेवटच्या दिवसापर्यंत १०८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज (गुरुवार ता. २० एप्रिल) रोजी मागे घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जे. पी. गावडे यांनी दिली.
कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक लागली असून, बाजार समितीच्या १८ जागांसाठी निवडणूक लागली होती. यापैकी चार मतदार संघातील उमेदवार बिनविरोध झालेले आहेत. निवडणूकीच्या रिंगणात असलेले उमेदवार कृषी पतसंस्था सर्वसाधारण मतदारसंघातून १५ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये शिवाजी इजगुडे, अशोक घोगरे, विलासराव घोळवे, सुभाष जगताप, आप्पासाहेब जगदाळे, उल्हास जाधव, मनोहर डुखे, तानाजीराव निंबाळकर, संग्रामसिंह निंबाळकर, महारुद्र पाटील, संदीप पाटील, दत्तात्रय फरतडे, विलास माने, रोहित मोहोळकर, संपत सरक हे आहेत.

तसेच कृषी पतसंस्था महिला प्रतिनिधी मतदारसंघातून सहा महिला उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये संध्या इजगुडे, सुप्रिया कोळेकर, मंगल झगडे, संध्या देवकर, नर्मदा पवार, रूपाली वाबळे तर कृषी पतसंस्था इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून तुषार जाधव, देविदास भोंग या दोघांमध्ये लढत होणार आहे.
कृषी पतसंस्था विमुक्त जाती भटक्या जमाती
मतदारसंघात तीन उमेदवार उभे राहिले आहेत. यामध्ये शिवाजी इजगुडे, बाळासाहेब चितळकर, आबा देवकाते तसेच ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून सहा उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये संतोष गायकवाड, सुभाष गायकवाड, उल्हासराव जाचक, धोंडीबा थोरात, मधुकर भरणे, तानाजी भोंग तर ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकातून तानाजी नरोटे, अनिल बागल या दोघांमध्ये सामना रंगणार आहे.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीमध्ये एकत्र आल्यामुळे पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होईल असे बोलले जात होते. मात्र चार जागा बिनविरोध झाल्या असून इतर १४ जागांसाठी दोन पॅनल उभे राहिले असल्यामुळे बाजार समिती बिनविरोध होऊ शकली नाही.



