महाराष्ट्र

हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त माळीनगर येथे KGN गृपच्या वतीने अन्नदान

प्रतिनिधी… रियाज मुलाणी
मो.9921500780

माळीनगर:जगाला शांतीचा संदेश देणारे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची १५०० वी जयंती आहे त्यानिमित्ताने माळीनगर येथे माळीनगर सवतगव्हाण मुस्लिम समाजाच्या वतीने मोटरसायकल रॅली काढण्यात आली, रॅली सवतगव्हाण येथे आल्यानंतर तेथील मुस्लिम समाजबांधवांच्या वतीने, सर्वांना मसाला दुधाचे वाटप करण्यात आले,

तसेच KGN ग्रुप माळीनगर यांच्या वतीने सर्व हिंदू मुस्लिम बांधवांसाठी माळीनगर येथे अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच समाजाच्या वतीने जिलबी वाटप देखील ठेवण्यात आले होते, या कार्यक्रम प्रसंगी KGN गृप व समाज बांधवांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले यावेळी हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button