नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्र अधिकारी मुकुंद बंडा यांना 3 लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबी ज्योती देशमुख यांनी केले रंगेहात अटक

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पुनर्वसनामध्ये संपादित केलेल्या घराच्या बदल्यात सिडको कडून मिळणाऱ्या भूखंडची पात्रता निश्चित करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्याकरिता 7 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून 3 लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी सिडको नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्र अधिकारी मुकुंद बंडा यांना अँटी करप्शन ब्युरो नवी मुंबई पोलीस उपअधीक्षक ज्योती देशमुख यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी रंगेहात अटक केले आहे.
नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ पुनर्वसन करण्यामध्ये नवी मुंबई येथील (51) वर्षीय तक्रारदार यांचे घर जात असल्यामुळे त्यांना त्या घराच्या बदल्यात भूखंडाची पात्रता निश्चित करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून मंजुरी मिळवून देण्यासाठी सिडको नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्र अधिकारी मुकुंद चंद्रकांत बंडा वय वर्ष (57)यांनी तक्रारदार यांच्याकडे 7 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली
यावरून तक्रारदार यांनी या अधिकाऱ्याची लेखी तक्रार 2 मार्च 2023 रोजी अँटी करप्शन ब्युरो नवी मुंबई कार्यालयात केली होती या तक्रारीची पडताळणी करून अँटी करप्शन ब्युरो पोलीस अधीक्षक श्री.सुनील लोखंडे ठाणे परिक्षेत्र व अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अनिल घेरडीकर ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली
अँटी करप्शन ब्युरो नवी मुंबई पोलीस उपअधीक्षक ज्योती देशमुख, पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे, पोलीस हवालदार पवार, चालक पोलीस हवालदार गायकवाड, पोलीस नाईक ताम्हाणेकर, पोलीस शिपाई चौलकर या टीमने गुरुवार दिनांक 16 मार्च 2023 रोजी दुपारी 12.30 वाजता सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून या 7 लाखापैकी 3 लाख रुपयांचा पहिला हप्ता लाच म्हणून स्वीकारताना सिडको नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्र अधिकारी मुकुंद बंडा यांना रंगेहात अटक केली आहे.



