पालघर जिल्ह्यातील सफाळे भागातील मांडे- विठ्ठलवाडी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील विनय गार्डन इमारतीमधील दूषित सांडपाणी राष्ट्रीय महामार्गावर.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640 पालघर जिल्हा वृत्तांत.
पालघर जिल्ह्यातील सफाळे भागातील मांडे-विठ्ठलवाडी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील वडापाव स्टॉप शेजारी बांधण्यात आलेल्या विनय गार्डन इमारती मधील गटाराचे दूषित सांडपाणी विटी लाईनच्या मेन राष्ट्रीय महामार्गावर गेल्या एक महिन्यापासून वाहत असल्यामुळे या घाणीच्या पाण्याचा नाहक त्रास वाहतूकदार व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

या दूषित पाण्यामुळे या भागात रोगराई पसरून नागरिकांच्या आरोग्यास धोका उद्भवू शकतो अशी भीती या भागातील नागरिकांनी व्यक्त केली असून हे दूषित सांडपाणी भर रस्त्यात वाहतुकीच्या ठिकाणी वाहून जाऊन या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या खाजगी बोरवेल च्या पाण्यामध्ये मध्ये शिरगाव करत असल्यामुळे बोरवेलच्या पाण्यामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

यामुळे या भागात या दूषित सांडपाण्यामुळे रोगराई पसरू शकते अशी भीती या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. एक महिन्याआधी विनय गार्डनच्या मालकाला ग्रुप ग्रामपंचायत मांडे – विठ्ठलवाडी यांनी याबाबत नोटीस ही बजावली आहे.



