कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार – नीरज उबाळे

नीरज उबाळे यांनी अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला
प्रतिनिधी- रियाज मुलाणी
मो.9921500780
अकलूज पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक नीरज उबाळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना म्हणाले संत तुकाराम महाराज वे पालखी सोहळ्याचे आगमन काही दिवसात माळशिरस तालुक्यात होत आहे. त्यासाठी योग्य ते ये नियोजन करण्यात आले आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी विविध पदांवर काम केलेले आहे.
त्यामध्ये गुन्हे अन्वेषण आणि भ्रष्टाचार विरोधी कारवाईचा व्यापक अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी पुणे व मुंबई येथे अंटी करप्शन ब्युरो आणि काईम बॅच सारख्या महत्वाच्या विभागांमध्ये काम पाहिले असून, सांगली येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारीने पार पाडली आहे. वारीच्या पार्श्वभूमीवर पॉलिस यंत्रणा सज्ज असून, कुठल्याही प्रकारचा अनुचित घडू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे.
तसेच नागरिकांनी पोलीस खात्यास सहकार्य करावे, असे आवाहन उबाळे यांनी यावेळी केले. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या काळात पोलीस यंत्रणा अधिक कार्यरत राहणार असून, शांतता आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस विभाग सज्जा असल्याची ग्वाही त्यांनी दिली.



