जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त केळवा सागरी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांचे सफाळे आगरवाडी येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त किशोरवयीन, तरुण मंडळी व लहान मुलांमध्ये जागरूकता निर्माण होऊन भावी तरुण पिढीला या जीवघेण्या अंमली पदार्थाच्या सेवना पासून रोखण्याच्या उद्देशाने जगभरात 26 जून रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त शासनाकडून विविध मार्गदर्शन कार्यक्रम राबवले जातात.
या अनुषंगाने पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली केळवा सागरी पोलीस ठाणे यांच्या वतीने गुरुवारी सफाळे आगरवाडी येथील ग्रामीण विद्या विकास वर्धिनी मंडळ, लायन्स क्लब ऑफ बॉम्बे वेस्ट इंग्रजी माध्यम शाळांमधील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या प्रमुख केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही स्वरूपातील अंमली पदार्थाचे सेवन केल्यास शरीराला हानिकारक नुकसानदायक असते यामुळे तरुण पिढीने या व्यसनापासून अलिप्त रहावे व उत्तम निरोगी जीवन जगण्यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन करावे तसेच बाल गुन्हेगारी पासून लांब राहून मुलींनी आपत्कालीन समस्या निर्माण झाल्यास तात्काळ पोलिसांची संपर्क साधावा असे मार्गदर्शन केले. यावेळी या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रुपाली भोईर शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



