माळशिरस तालुक्यातील आरपीआय कार्यकर्त्यांनी गाव भेट दौऱ्यावर दिला भर

बी टी शिवशरण
राजाभाऊ सरवदे हे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झालेपासून कार्यकर्ते उत्साहाने आरपीआय आठवले गटाला नवसंजीवनी देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत माळशिरस तालुक्यातील आरपीआय चे तालुका पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी शाखा पदाधिकारी यांनी गेल्या रविवार पासुन तालुक्यातील गावभेट दौरा सुरू केला आहे त्यात गाव तिथे आरपीआय आठवले गट शाखा उद्घाटन सभासद नोंदणी अभियान गावातील शहरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन चर्चा संवाद साधला जात आहे त्यामुळे पक्ष बांधणीसाठी हा गावभेट दौरा प्रभावी ठरत आहे येणार्या स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा लोकसभा निवडणुकीत आरपीआयचे कार्यकर्त्यांनी तयारीला लागून राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांचे हात बळकट करण्यासाठी व पक्ष मजबूत बांधणीसाठी गावपातळीवर संघटन मजबूत करणे हा उद्देश आहे
सोलापूर जिल्हा हा आरपीआय आठवले गटाचा बालेकिल्ला आहे त्यामुळे या पक्षाची सामाजिक राजकीय ताकद मोठी आहे मध्यंतरी जिल्ह्यातील दोन गट एकत्रित करुन कार्यकर्त्यांचे मनोमिलन घडविण्यात प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांची शिष्टाई यशस्वी झाली आहे त्यामुळे जिल्ह्यातील वरिष्ठ नेते पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित येऊन पक्षाचे काम रामदास आठवले यांचे विचार निर्णय धोरण पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत आहेत गावभेट दौरा करण्यासाठी सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांचे नेतृत्वाखाली तालुक्यातील गाव अध्यक्ष सरचिटणीस शहरं अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी तसेच तालुका पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी दर रविवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सात पर्यंत गावभेट दौरा करत आहेत
सर्व पदाधिकारी आपापल्या घरुन जेवणाचा डबा घेऊन सामील होत आहेत गावभेट दौरा ही संकल्पना पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक व प्रभावशाली ठरत असल्याने युवा कार्यकर्ते कार्यकर्ते नेते यांच्यात चांगला समन्वय होत आहे जिथे पक्षाची शाखा नाही तेथे शाखा काढण्यासाठी मार्गदर्शन फलक उद्घाटन पदाधिकारी निवड पक्षाचे नविन ध्येय धोरण व क्रियाशील सभासद नोंदणी करण्यासाठी पदाधिकारी मार्गदर्शन करत आहेत आता खरे अर्थाने चळवळ गतीमान होऊन आरपीआय आठवले गट सामाजिक राजकीय दृष्ट्या जनमानसात सक्रिय झाला आहे
माळशिरस तालुक्यातील युवा कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते हे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांचे नेतृत्वाखाली पहिल्यापासून कार्यरत आहेत आता तर अनेक. कार्यकर्ते जोडले जात आहेत तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांनी आरपीआय आठवले गटाच्या शाखा माळशिरस तालुक्यात प्रत्येक गावात शहरात वस्त्या वाड्यावर शाखा काढून पक्ष वाढवणार असल्याचे जाहीर केले आहे त्यांच्या भुमिकेला तालुक्यातील आरपीआय कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला आहे



