हेस वेल्फर फाउंडेशनच्या उपोषणाची प्रशासनाने घेतली तात्काळ दखल.

प्रतिनिधी…. रियाज मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज
अकलूज येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करुन उपोषणास सुरुवात
मौजे अकलूज येथील सिटी सर्वे नंबर 987 मधील रस्त्यातील खुल्या जागेतील अतिक्रमण धारकांनी केलेल्या अतिक्रमण काढण्यात यावे ही मागणी हेस वेल्फर फाउंडेशन च्या वतीने करण्यात आली आहे

जिल्हाधिकारीसो सोलापूर यांना दिनांक 4 /8/ 2023 रोजी दिलेल्या निवेदनावरून अकलूज येथे प्रारंभ झाला या वेळी साप्ताहिक वैभव चे संपादक भाग्यवंत नायकुडेदादा यांच्या उपस्थितीत विलासनंद विठ्ठल गायकवाड, राजेंद्र ज्ञानेश्वर कांबळे, आदिनाथ मोहन जाधव, सुनील ज्ञानेश्वर कांबळे, दत्तात्रय मल्हारी शिंदे, शंकर धर्मा पाटील,सागर सिद्धार्थ जगताप , प्रदीप तानाजी धाईंजे, युवराज सदाशिव धाईंजे, भारत नामदेव वाघमारे, तानाजी ज्ञानदेव काटे, शंकर रामदास गायकवाड, अनिरुद्ध हनुमंत वाघमारे, सखुबाई सदाशिव धाईंजे,लोचना मोहन जाधव, वैशाली रोहिदास धाईंजे,विजया पांडुरंग गायकवाड ,अलकाबाई अरुण माने ,हिराबाई विश्वंभर क्षीरसागर ,सबिया सलीम शेख ,विद्या राजू साळवे, जिजाबाई तुकाराम धाईंजे,संगीता बलभीम धाईंजे, जयश्री मोहन धाईंजे ,हे कार्यकर्ते उपोषणास बसले होते
या वेळी उपोषण स्थळी स्वप्नीलभैया वाघमारे,राजाभाऊ खिलारे, शेखर खिलारे,अनिल साठे, यांनी उपोषण स्थळी भेट दिली

स्वप्निल भैया वाघमारे यांनी मुख्याधिकारी अकलूज नगरपरिषद अकलूज यांच्याशी फोनवर चर्चा करून तेथील प्रश्न मार्गी लावण्यास सांगितले अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी अकलूज नगरपरिषद चे कार्यालयीन अधीक्षक नरुटे साहेब , अतिक्रमण विभाग प्रमुख शिवरत्न लोंढेसाहेब यांनी समक्ष उपोषण स्थळी भेट देऊन दोन ते तीन दिवसात अकलूज नगरपरिषद चे मुख्याधिकारी साहेब यांच्या सहीने अनधिकृत अतिक्रमण धारकांना कायदेशीर नोटीस बजावण्यात येथील असे आदेश देण्यात आले
त्यामुळे आम्ही आमचे उपोषण तात्पुरते मागे घेत आहोत



