महाराष्ट्र
कुणाल पाटील यांची जामीनावर सुटका.. पालघर कोर्टाच्या आदेशान्वये कलम 304/2 रद्द..304/अ लागू.

जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत.
शनिवार दिनांक 22 जुलै 2023 रोजी झालेल्या आकाश पंढरी चौधरी मृत्यू प्रकरणातील कुणाल पाटील यांची पालघर न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.
मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी 304/2 अशा कलमाखाली कुणाल पाटील यांच्यावर सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर याबाबत पालघर कोर्टाने तातडीने या कलमांमध्ये बदल करून कुणाल पाटील यांच्यावर सफाळे पोलिसांनी लावलेले 304/2 हे कलम रद्द करण्याचे आदेश सफाळे पोलिसांना दिले आहेत. पालघर कोर्टाच्या आदेशान्वये सफाळे पोलिसांनी 304/2 या कलमा एवजी कुणाल पाटील वर 304/अ असे कलम लागू केले आहेत .



