महाराष्ट्र

श्रमसंस्कार शिबिरातून सेवेचा संस्कार – मुख्याध्यापक अमोल फुले

अकलूज प्रतिनिधी – तात्यासाहेब काटकर

अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयातील उच्च माध्यमिक विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विजयवाडी विझोरी या गावात श्रमसंस्कार शिबीराचे उद्घाटन स्थानिक वप्रशाला समितीचे सदस्य अप्पासाहेब मगर यांनी केले. उद्घाटनप्रसंगी श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून समाज मन कळते. श्रम, सेवेचा संस्कार होऊन विविध उपक्रम व तज्ज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानातून ऊर्जा व ज्ञानप्राप्ती होते. एकत्र काम केल्याने मैत्री भावना, सहकार्य यातून समाजसेवेचा वसा मिळतो, तसेच स्वयंशिस्त, समाजसेवा, लोकशाही, मूल्यशिक्षण हे सर्व स्वयंसेवकांमध्ये रुजविण्यात राष्ट्रीय सेवा योजना यशस्वी झाली आहे. राष्ट्रीय सेवा करण्याची संधी यानिमित्ताने मिळते. असे प्रतिपादन विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले यांनी केले.

प्रास्ताविक मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी बलभिम काकुळे यांनी गावांमधील शाळापरिसर, व्यायामशाळा परिसर, समाजमंदिर, विविध वस्त्यांमध्ये जाऊन स्वच्छता मोहिम, स्मशानभूमी, मंदिर, रस्ते स्वच्छता, ग्रामपंचायत परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविले जाईल असे सांगितले. शाळा व स्वयंसेवक यांची स्वच्छता फेरी, स्वच्छता व साक्षरता दिंडी, वृक्षारोपण करून पर्यावरण जागृतीच्या संदर्भात पाणी आडवा पाणी जिरवा संदेश देऊन 50 स्वयंसेवकांकडून सात दिवसांत स्वच्छता करणार असल्याचे सांगितले. गावाचे सहकार्य असल्याशिवाय कोणतेच काम होत नाही.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिर उद्घाटनप्रसंगी स्थानिक प्रशाला समिती सदस्य अप्पासाहेब मगर, विजयवाडी गावाचे सरपंच, उपसरपंच, बाळासाहेब इंगळे, हनुमंत पवार, ग्रामसेविका मनिषा साठे, मुख्याध्यापक मदन माने देशमुख, शाळेचे शिक्षक, गावातील ग्रामस्थ तसेच विद्यालयाचे उपप्राचार्य सुभाष मुंडफणे, संजय जाधव, शिक्षक शिक्षकेतर सेवक व राष्ट्रीय सेवा योजनेचे 50 स्वयंसेवक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button