शहर

शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये साजरा झाला ‘मराठी राजभाषा दिन’

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

२७ फेब्रुवारी
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने पावन झालेल्या, संतांच्या शिकवणीने प्रेरित झालेल्या आणि कुसुमाग्रजांच्या साहित्याने समृद्ध झालेल्या महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मातीत जन्मलेल्या सर्व मराठी मावळ्यांना शुभेच्छा देऊन शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.

आज मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने का होईना आपल्याला आपल्या मातृभाषेचा सन्मान करण्याची संधी मिळत आहे. मराठी भाषेची थोरवी गाणाऱ्या ज्ञानपीठ प्राप्त महान साहित्यिक वि. वा. शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी आपण आपल्या मातृभाषेचा गौरव करत असतो.

कुसुमाग्रज यांनी स्वातंत्र्य, न्याय , गरिबी यासह अनेक विषयांवर लेखन केले त्यांच्या लेखन साहित्यानेच मराठी रंगभूमीला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. महाराष्ट्रभर संस्कृतिक, शैक्षणिक, भाषिक कार्यक्रम आयोजित करून आजचा हा दिवस साजरा केला जातो.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेतील मराठी विषय शिक्षिका . शिल्पा जाधव यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये काही विद्यार्थ्यांनी भाषणे केली तर काही विद्यार्थ्यांनी मराठी कविता, चारोळ्या सादर केल्या. तर प्रशालेतील शिक्षक श्री गणेश शेवकर आणि शिक्षिका सौ सुवर्णा निंबाळकर यांनी मराठी गीत सादर केले.
उच्चशिक्षित होऊन हिंदी , इंग्रजी सारख्या भाषा अवगत करून, ग्लोबल होऊन मराठी माणूस आज आपल्या मातृभाषेला विसरत चालला आहे. पण ती टिकावी- तिची किंमत वाढावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठी भाषा वाचवण्यासाठी मराठी भाषेचे संवर्धन करून ती टिकवली पाहिजे. अशाच आशयाने कार्यक्रमाचा शेवट अध्यक्षीय भाषणाने झाला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सहावीतील चि. सोहम प्रशांत जाधव आणि चि.हर्ष अमित ढाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशालेतील शिक्षिका सौ सुवर्णा निंबाळकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button