शहर

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू जव्हार यांच्या संयुक्त विद्यमानाने 8 नोव्हेंबर रोजी पालघर जीवन विकास मैदानावर कातकरी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

आदिवासी संस्कृतीचे जतन व्हावे व आदिम कातकरी समाजाच्या संस्कृतीचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू व जव्हार जिल्हा पालघर यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवार दिनांक 08 नोव्हेंबर 2023 रोजी जीवन विकास संस्थेचे स.तू कदम विद्यालय मैदान पालघर येथे कातकरी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कातकरी सांस्कृतिक महोत्सवात गौरी नाच,घोरनाच, तारपा नृत्य, संबळ नृत्य अशी सांस्कृतिक लोकनृत्य सादर केली जाणार आहेत.तसेच पालघर जिल्ह्यातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन या महोत्सवात केले जाणार असून या वस्तूंच्या विक्रीसाठी स्टॉल देखील उभारण्यात आले आहेत.

या महोत्सवात पारंपरिक वेशभूषा स्पर्धा, पारंपरिक खाद्यपदार्थ पाककला स्पर्धा, वारली गोंडी चित्रकला अशा अनेक स्पर्धेसह समूह नाटिका सादरीकरणाच्या स्पर्धेचे देखील आयोजक करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या लाभार्थी कातकरी समूह विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम बक्षीस दिले जाणार असून या कातकरी सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमातील कातकरी बांधवांचा उत्साह वाढवण्यासाठी सर्व पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा

तसेच कातकरी समुदायातील कोणताही क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तींनी 886546593, व 9970821098 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती संजीता महापात्र यांनी पालघर जिल्ह्यातील जनतेला केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button