महाराष्ट्र

लोहगाव येथील मातोश्री जिजामाता विद्यालय, व कै,प्रभाकर भस्मे उच्च माध्यमिक विद्यालयात, इयत्ता १० वी, व १२,वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

प्रतिनिधी- रुपेश डोलारे, उस्मानाबाद..

मातोश्री जिजामाता विद्यालय लोहगाव व कै . प्रभाकर भस्मे उच्च माधमिक विद्यालय लोहगाव या विद्यालयात आज दि.17/02/2023 रोजी इयत्ता 10वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला . अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री शिवाजी रामचंद्र मारेकर होते . प्रमुख पाहूणे नळदूर्ग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सिध्देश्वर गोरे साहेब जळकोट बीटचे हवालदार श्री शिंदे साहेब तसेच पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी श्रीमती इनामदार मॅडम व जळकोट बिटचे विस्तार अधिकारी श्री वाघमोडे साहेब व विद्यालयाच्या प्राचार्या श्रीम. पवार मॅडम होते .
सूतसंचलन श्री कलशेट्टी सर यांनी केले . प्रास्तावीक प्राचार्या पवार मॅडम यांनी मांडले . गोरे साहेब यांनी विदयार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले . बी ओ . इनामदार मॅडम यांनी बोर्ड परीक्षा -2023 संबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . विस्तार अधिकारी वाघमोडे साहेबानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . शेवटी अध्यक्षीय भाषण नंतर कार्यक्रम संपन्न झाला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button