शहर

आकाश चौधरी मृत्यु प्रकरणी कुणाल पाटील यांच्या विरुद्ध सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640 पालघर जिल्हा वृत्तांत.

विराथन बुद्रुक येथील आकाश चौधरी 16 जुलै 2023 रोजी संध्याकाळी सात वाजता सफाळे येथे आपल्या दुचाकीवरून जात असताना सफाळे फ्लेवर रेस्टॉरंट जवळ त्याच्या अंगावरून सफाळे मांडे गावातील कुणाल पाटील यांनी आपली MH-12-UJ-2296 या क्रमांकाची किया कंपनीची कार नेल्यामुळे त्याचा शनिवार दिनांक 22 जुलै 2023 रोजी सकाळी मृत्यू झाला होता.

या घटनेला एक आठवडा होऊन देखील सफाळे पोलिसांनी आरोपी विरुद्ध कुठलाही गुन्हा दाखल केला नव्हता याबाबत शोध पत्रकारिता करून आकाश चौधरीच्या अंगावरून गाडी नेल्याचा व्हिडिओसह बातमी टाईम्स नाईन न्यूज मराठी चॅनल पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत यांनी प्रसिद्ध केल्यावर पालघर जिल्हा पोलीस बाळासाहेब पाटील यांनी या बातमीची दखल घेऊन

कुणाल पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांची गाडी जप्त करण्याचे आदेश सफाळे पोलिसांना दिल्यामुळे सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवली यांनी कुणाल पाटील यांच्या विरुद्ध मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी गुन्हा दाखल केला असून सफाळे पोलीस कुणाल पाटील यांचा शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button