करमाळा येथे मदरसा फैजुल कुराण येथे स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी अलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
भारत देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिन करमाळा येथील मदरसा फैजुल कुराण येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मदरसा मधील मौलाना इस्माईल कारी यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर मदरशा मधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गायली एकंदर पाहता झेंडावंदनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला

यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बोलताना इस्माईल कारी म्हणाले की इंग्रज काळात अनेक तरुण मुस्लिम बांधवांनी भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग बलिदान दिले यावर त्यांनी प्रकाश टाकला यावेळी मौलाना हाफिज सय्यद अली, मौलाना कादर शेख, सादिक नालबंद, पापा नालबंद, तसेच हाजी अहमद बागवान व अजीम मोगल इत्यादी उपस्थित होते
यावेळी सदरच्या राष्ट्रध्वज कार्यक्रमाला मोठे संख्येने विद्यार्थी तसेच पालक वर्ग उपस्थित होते



