तोतया पोलिसासह त्याच्या तीन साथीदारांना मुद्दे मालासह जेरबंद करण्यात कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या पथकाला यश.
पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत
मी पोलीस आहे अशी बतावणी करून 500 रुपयांच्या नोटांच्या बदल्यात 100 रुपयांच्या दुप्पट किमतीच्या नोटा देण्याचे आमिष दाखवून 100000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसासह त्याच्या तीन साथीदारांना कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या पथकाने जेरबंद करून त्यांच्या ताब्यातील 2 मोटरसायकल आणि 100000 रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे.
प्रवीण मधुकर वड (वय वर्ष 29) असे या तोतया पोलिसाचे नाव असून तो पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील उतावली येथील रहिवासी आहे. तर त्याचे दुसरे साथीदार पप्पू बबन कडव (वय वर्ष 35) राहणार वाडा- सावनी, नितेश कृष्णा भोईर( वय वर्ष 32) वाडा- सावनी खुर्द, आणि नितीन पदु धनवा (वय वर्ष 30)राहणार वाडा- वरला या चौघांनी संगनमत करून तलासरी येथील महेश मरल्या रायात यांना चारोटी ब्रिज जवळ बोलून त्यांच्या ताब्यातील 50 हजार रुपयांची अशी दोन बंडल बॅगेत ठेवायला सांगितली व हे चौघे पळून गेले होते.
या सर्व आरोपींना त्यांच्या राहत्या घरातून कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, पोलीस उपनिरीक्षक बी.ए गायकवाड, पोलीस हवालदार ए. बी. चव्हाण आणि कासा पोलीस ठाणे पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने अटक करून त्यांच्या ताब्यातील दोन मोटरसायकल आणि एक लाख रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे. या चारही आरोपींना 25 जुलै 2023 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.