उस्मानाबाद येथे मणिपूर राज्यात महिला वरील हिंसाचारा च्या विरोधात सर्व पक्षीय मौन सत्त्यागृह
उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो.—9730 867 448
मणिपूर राज्यात महिलावरील हिंसाचार व अत्याचार प्रकरणी उस्मानाबाद(धाराशिवकर)येथे स्तब्ध उभे राहून , तासभर मौन पाळून सर्वपक्षीय, संघटनांची एकजूट. होऊन घटनेचा निषेध करण्यात आला.
मणिपूर राज्यात स्त्रियांवर झालेल्या अमानवी कृत्याबद्दल उस्मानाबाद(धाराशिवकर) स्तब्ध झाले.
रविवारी सकाळी शहरातील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून शहरातील विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकारांनी तासभर मौन सत्याग्रह केले.
तसेच मानवतेला काळिमा फासणाऱ्या देशविघातक कृत्याच्या निषेधार्थ संताप व्यक्त केला. मणिपूर राज्यात मागील तीन महिन्यांपासून हिंसाचार, दंगल, जाळपोळ, सैनिकांवर हल्ले आणि महिला अत्याचार सुरूच आहेत.
महिलांवर झालेला सामूहिक अत्याचार किळसवाणा आणि संतापजनक आहे. या सगळ्या संतापजनक प्रकाराचा जाहीर निषेध करण्यासाठी शहरात मौन सत्याग्रह आंदोलन आयोजित करण्यात आले होते. शहर व जिल्ह्यातील आणि परिसरातील नागरिक बहुसंख्येने यात सहभागी झाले होते.