कवी इंद्रजीत पाटील -“चैतन्यश्री काव्यगाैरव “राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
सरकार स्वाभिमानी वाचनालय आणि कुमार व कन्या मंदीर,इंगळी,ता.हातकणंगले,जि.काेल्हापूर आयोजित १३ व्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात कवी ‘इंद्रजीत पाटील यांना राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कारांतर्गत” चैतन्यश्री काव्यगाैरव” राज्यस्तरीय पुरस्कार-२०२३ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व राेख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप हाेते.हे साहित्य संमेलन
दि.-०५/०३/२०२३,वार-रविवार राेजी कुमार विद्या मंदीर,इंगळी येथील भव्य मैदानात पार पडले.या संमेलनातील ग्रंथ दिंडीचे उदघाटन सकाळी ८.३० वा.कवी अजयकुमार वंगे,लातूर यांच्या हस्ते झाले.
संमेलन अध्यक्ष,प्रसिद्ध साहित्यिक .डाॅ.श्रीकांत पाटील,घुणकी,स्वागताध्यक्ष जंबुकुमार देसाई,उध्दाटक साहित्यिक व विचारवंत .डाॅ.सुरेश कुऱ्हाडे, गडहिंग्लज, प्रमुख अतिथी प्रा.किसनराव कुऱ्हाडे,कवी भाऊसाहेब कांबळे,ममदापूर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना सुपूर्द करण्यात आला.
या प्रसंगी कवी मधुकर हुजरे,धाराशिव,ज्येष्ठ साहित्यिक दत्तात्रय मानगुडे,पलूस-सांगली,कवी काकासाहेब देशमुख,कवी/लेखक तानाजी धरणे,रायगड व महाराष्ट्रातील इतर नामांकित ज्येष्ठ व युवा साहित्यिक आवर्जून या संमेलनासाठी उपस्थित हाेते.तिसऱ्या सत्रातील कवी संमेलनात कवी इंद्रजीत पाटील यांनी ग्रामीण जीवनावर आधारित बहारदार कविता सादर केल्यामुळे त्यांचे विशेष काैतुक झाले.
या साहित्य संमेलनातील तिन्ही सत्राचे सूत्रसंचालनही कवी/लेखक इंद्रजीत पाटील यांनीच केले तर प्रास्ताविक कवी सरकार इंगळी यांनी केले.साताप्पा सुतार,शिवाजी येडवान,दस्तगीर मुलाणी,विश्वास पाटील,बाबा जाधव व संमेलन कमिटीतील इतर सदस्य यांचे या संमेलनासाठी अनमाेल सहकार्य लाभले.
साहित्यिक इंद्रजीत पाटील यांची साहित्यक्षेत्रातील उत्तुंग भरारी पाहून ज्येष्ठ साहित्यिक बाबा मडावी,यवतमाळ, पंडितराव लाेहाेकरे,संजय भड,अमाेल देशमुख,चंद्रकांत पाटील,रावसाहेब पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.



