माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नालासोपारा येथील रुग्णांना फळे व मिठाईचे वाटप

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नालासोपारा शहर समेळ पाडा विभागा मार्फत नालासोपारा पश्चिम आयोजित पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या वाढदिवसा निमित्त शनिवार दिनांक 27 जुलै 2024 रोजी वसई विरार शहर महानगरपालिका रुग्णालयामध्ये व आयुष्य हॉस्पिटल तसेच महानगरपालिकेचे सफाई कामगार नालासोपारा पोलीस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचारी यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व विनायक लाड (उपविभाग प्रमुख) विलास सावंत (उपशाखाप्रमुख) यांच्या सहकार्याने फळे व मिठाई वाटप करून उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला


या कार्यक्रमाला प्रवीण म्हापळकर (उपजिल्हाप्रमुख) स्वप्निल बांदेकर (तालुकाप्रमुख) प्रणव खामकर (उपशहर प्रमुख) सौ पवित्र चंदा (शहर संघटक) सौ स्वाती राणे (उप शहर संघटक) मनोहर हरी पाटील (विभाग प्रमुख) सौ प्रज्ञा जाधव (विभाग संघटक) अश्विनी मलाडकर(शहर कार्यकारणी सदस्य) अभिषेक बाकाळकर (शाखाप्रमुख) सौ चित्रा शेणवी (शाखा संघटक) हिना खरात (शाखा संघटक) सौ आरती निकम (गट संघटक) विनीत जाधव (युवा सेना विभाग अधिकारी) रत्नदीप सावंत (युवा सेना शाखा अधिकारी) तसेच आजी-माजी पदाधिकारी महिला आघाडी युवासेना व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



