शहर

पालघर येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 12 आरोपींना जेरबंद करण्यात पालघर पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे आणि पोलीस उपनिरीक्षक संकेत पगडे यांच्या पथकाला यश

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640 पालघर जिल्हा वृत्तांत.

पालघर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या सूचनांचे व आदेशांचे पालन करताना पालघर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर पोलीस ठाणे हद्दीत पोलीस उपनिरीक्षक संकेत पगडे आणि त्यांची टीम सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी रात्री गस्त घालत असताना

पालघर नवली फाटा जवळील एस.बी.आय बँकेच्या एटीएम समोरील मोकळ्या जागेत संशयित हालचाल करत असताना दोन इसम पोलीस उपनिरीक्षक संकेत पगडे यांच्या दिसून आल्यावर त्यांनी त्यांच्या टीमसह त्यांची अधिक चौकशी करत असताना अंधाराचा फायदा घेऊन अन्य दहा जण अंधारात लपून बसले होते या पोलिसांना पाहून ते पळून जाण्याच्या मार्गावर असताना पालघर येथील ग्रामस्थांच्या मदतीने 12 आरोपीं पकडण्यात पालघर पोलिसांना यश आले

हे 12 आरोपी पालघर येथे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आले होते त्यांच्या ताब्यातील दोन चार चाकी मोटर, लोखंडी कटर, लोखंडी कटावणी, धारदार लोखंडी कोयता, मिरची पावडर, नायलॉन दोर, खिळे काढण्याचे कटर असे दोडा टाकण्याचे साहित्य मिळून आले आहे.

सदरची यशस्वी कामगिरी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर विभाग पोलीस अधिकारी श्रीमती नीता पाडवी, पालघर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी दत्तात्रेय किंद्रे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मंजुषा शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक संकेत पगडे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी मुंडे पोलीस उपनिरीक्षक दौलत आतकारी,सहाय्यक फौजदार खंडागळे, पोलीस हवालदार रवींद्र गोरे, पोलीस हवालदार आर.एम. पवार, पोलीस हवालदार आव्हाड, पोलीस हवालदार सुरूम, पोलीस नाईक लहांगे, पोलीस नाईक मुसळे,पोलीस नाईक खराड, पोलीस नाईक कांबळे या टीमने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button