अंबोडा येथील गावकऱ्यांनी दिला रास्ता रोकोचा इशारा 18 जुलै रोजी करणार महागाव तहसील कार्यालयासमोर रस्ता रोको

प्रतिनिधी:-मायाताई सागर पाईकराव यवतमाळ
महागाव तालुक्यातील आंबोडा येथील शेकडो नागरीक महागाव तहसील कार्यालयासमोर दिनांक ७ जुलै २०२३ पासून विद्युत वितरणाच्या विरोधात साखळी उपोषण करत आहेत.मागील एक महिन्यापासून त्यांना विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने अनेक अडचणींना समोर जावे लागत होते यामुळे दिनांक १० जुलै २०२३ रोजी पासून साखळी उपोषण सुरू केले असता या उपोषणास उमरखेड महागाव विधानसभेचे मतदार ससंघाचे आमदार नामदेवराव सोसायटी यांनी भेट दिली असता लवकरच तोडगा काढून अंबोडा या गावात सुरळीत वीजपुरवठा केल्या जाईल असे आश्वासन दिले होते परंतु अजूनही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने गावातील नागरिकांनी नाईलाजास्तव महागाव तहसीलच्या तहसीलदार अश्विनी मुपोडे यांना दिनांक १८जुलै २०२३ रोजी महागाव तहसील कार्यालयाच्या समोर रास्ता रोको करत असल्याबाबत निवेदन दिले आहे.

या निवेदनात उपरोक्त विषयाचे अनुषंगाने आम्ही आपणास नम्रपणे निवेदन देतो की,आम्ही आपल्याकडे मौजा आंबोडा येथील मागील एक महिन्यापासून खंडित असलेल्या विद्युत पुरवठा सुरळीत करणे बाबतचा अर्ज दिनांक ३ जुलै २०२३ रोजी दिला होता त्यामध्ये आम्ही दिनांक १०-७-२०२३ पासून साखळी उपोषण करणार आहोत निवेदनातून कळविले होते.त्यानुसार आम्ही दिनांक १०/७/ २०२३ पासून साखळी उपोषणाची सुरुवात केली आहे.साखळी उपोषण आज रोजी चालू आहे उपोषण मंडपास भेट देण्याकरिता महागाव उमरखेड विधानसभेचे आमदार माननीय ससाने साहेब व संबंधित कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी भेट दिली असता आम्ही सदरील प्रकरण लवकरात लवकर तोडगा काढून विद्युत पुरवठा पहिल्यासारखा सुरळीत करून देऊ असे आश्वासन दिले होते.

परंतु आतापर्यंत देण्यात येत असलेला विद्युत पुरवठा हा पहिल्यासारखाच वारंवार खंडित होत आहे तात्पुरत्या दिलेल्या रोहित्री निकामी होत आहे.त्यामुळे आम्ही ग्रामपंचायत मौजा आंबोडा व गावातील समस्त नागरिक अतिशय त्रस्त झालो आहोत त्यामुळे नाईलाजास्तव आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून दिनांक १८/७/२०२३ रोजी मंगळवार या दिवशी दुपारी एक वाजता महागाव तहसील कार्यालयासमोर रास्तारोको आंदोलन करणार आहोत याची नोंद घेण्यात यावी असे शेकडो नागरिकांच्या सह्या असलेल्या लेखी स्वरुपाच्या निवेदनात नमूद केले आहे.

या निवेदनावर दिनांक १८ जुलै २०२३ पर्यंत वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता व कर्मरचारी आंबोडा वासियांना सुरळीत वीज पुरवठा करतात हे ही पाहणे गरजेचे ठरणार आहे.



