संदीप भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली सिन्नर तालुका अन्याय अत्याचार निर्मूलन समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न…

टाईम्स नाईन न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640.
अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र जाधव यांच्या उपस्थितीत तथा तालुका अध्यक्ष संदीप काशिनाथ भालेराव यांच्या अध्यक्षते खाली सिन्नर विश्रामगृह येथे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
या बैठकी जनतेवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आश्वासक व प्रखर असे व्यासपीठ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामास लागावे तसेच आपल्याकडे आलेल्या अन्यायग्रस्ताची पूर्ण बाजू समजून घेऊन स्वतः प्रत्यक्ष शहानिशा करून समोरच्याला न्याय देण्याचे काम इतरांवर अन्याय न होता संविधानिक पद्धतीने होणे गरजेचे अपेक्षित आहे ही भावना रवींद्र जाधव यांनी या बैठकी व्यक्त केली.
तसेच समाजातील समतोल राखत समभावाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काम करणे गरजेचे अपेक्षित आहे. त्याचबरोबर राजकीय व्यासपीठ सोडून जनतेसाठी आश्वासक भूमिका पार पाडण्यासाठी प्रयत्नशील राहण्याच्या सूचना रवींद्र दादा यांनी या बैठकीतील दिल्या त्याचबरोबर शासकीय कार्यालयात आलेल्या लोकांना कमीत कमी त्रासात चांगली सेवा मिळण्यासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी मजबुतीने उभे राहण्यासाठी प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर समितीचा फलक मोबाईल क्रमांक सह लावण्याची सूचना डॉ दीपक कुमार श्रीमाली यांनी केली.
तर प्रत्येक महिन्याच्या ठराविक दिवशी बैठकीचे आयोजन व विचारांची आदान प्रदान होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन संदीप भालेराव यांनी केले.
बळवंत जाधव यांच्याकडे असणाऱ्या संघटन कौशल्याचा वापर करत उत्तर महाराष्ट्र या विभागावर काम करण्याची संधी समितीच्या वतीने त्यांच्यावर टाकण्यात आलेली आहे.
शालांत परीक्षात यश संपादित केलेले विद्यार्थी, एमपीएससी मध्ये निवड झालेले, जेष्ठ नागरिक अशा सर्वांच्या सत्काराचा कार्यक्रम आठवड्याभरात तालुका पातळीवर राबवण्यात येऊन त्याच जागी नवीन कार्यकारणीची घोषणा करण्यात येण्याबद्दल रवींद्र जाधव यांनी सांगितले.
यावेळी भाग्यश्री ओझा, गौतम खरात, प्रियंका द्विवेदी, डॉक्टर दीपक श्रीमाली, प्रवीण जगताप, रोहिणी कुरणे, बळवंत जाधव, सुमनताई जोशी, शशीकांत अढांगळे, देवीदास अढांगळे, सचिन ओझा, शरद जाधव, रोहीणी कुरणे, सविता शिरसागर, रुपाली काळे, अक्षदा दामले, माया घोडेराव, विलास दराडे, सोनाली सोनवणे आदींसह असंख्य पदाधीकारी उपस्थित होते.



