नाटंबी येथे नारायण महाराजांच्या शुभहस्ते दत्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

भोर प्रतिनिधी दत्तात्रय बांदल
भोर तालुक्यातील नाटंबी येथे सद्गुरु नारायण महाराज यांच्या शुभहस्ते दत्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहणाचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
मागील दोन दिवसाच्या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी ग्रामस्थांच्या उपस्थितीत दत्तमूर्ती व कलशाची भव्य मिरवणूक करण्यात आली. या दिवशी प्रवचन, कीर्तन व भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तर शुक्रवारी सकाळी आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान मंदिरामध्ये दत्तमूर्ती व कलशाचा प्रवेश करण्यात आला. यानंतर दत्तमूर्तीचे अभिषेक व नवग्रहाचे पूजन करण्यात आले.
शुक्रवारी अकरा वाजता नाटंबी गावात सद्गुरु नारायण महाराज यांच्या आगमन झाले यावेळी त्यांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक नंतर दत्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा स्थापना व कलशारोहणाचा समारंभ सद्गुरु नारायण महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
नाटंबी गावातील दत्त मंदिराचे काम लोकवर्गणीतून केले असून कलशारोहण सोहळा यशस्वी होण्यासाठी यशवंत खोपडे, शंकर खोपडे, नामदेव घाटे, भरत खोपडे, अंकुश खोपडे, ओंकार खोपडे, विनोद घाटे, पंढरीनाथ खोपडे, नवनाथ घाटे, विशाल खोपडे, शुभम खोपडे , पांडुरंग वाडकर, किरण खोपडे, सुरेश पोळ, पुंडलिक खोपडे, अमोल धोंडे, विकास खोपडे, समीर घोडेकर, पराग शिळीमकर, गणेश भागवत, संतोष मेढेकर, तानाजी चव्हाण व जयवंत बांदल उपस्थित होते.




