सरकारी शाळांचे खाजगीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करा – बहुजन ब्रिगेड महासंघाचे मागणी

प्रतिनिधी… रियाज मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो.99 21 500 780
राज्यातील सरकारी शाळांचा पायाभूत विकास व्हावा यासाठी या शाळा दहा वर्षासाठी कॉपरेट उद्योग समूह स्वयंसेवा संस्था आदिना दत्तक दिल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. कंत्राटी भरती पाठोपाठ आता सरकारी शाळांचे देखील खाजगीकरण करत हे सरकार लाखो तरुणांच्या मेहनतीवर पाणी फिरवण्याचे काम करत आहे.
या निर्णयाविरोधात बहुजन ब्रिगेड महासंघाने आवाज उठवला आहे. राज्य शासनाने सरकारी शाळांच्या बाबतीत घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करावा, अन्यथा बहुजन ब्रिगेड महासंघाच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात राज्यभर जन आंदोलन छेडणार असल्याचा इशारा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संदीप मोहिते यांनी दिला आहे.
तसे पत्र विभागीय आयुक्त पुणे यांना देण्यात आले आहे
याप्रसंगी बहुजन ब्रिगेड महासंघाचे संस्थापक उपाध्यक्ष गणेश साठे, कार्याध्यक्ष नितीन पोळ, विशाल खंडाळे,उपस्थित होते.



