महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पालघर जिल्ह्यातील तरुणांचा जाहीर पक्षप्रवेश
टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा प्रतिनिधी
विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना विभागाची पालघर जिल्ह्याची आढावा बैठक पालघर शहर येथे पार पडली यावेळी जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, विक्रमगड, मनोर, पालघर शहर विभागातील तरुणांनी राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. तसेच राज ठाकरे यांच्या आदेशाने आणि रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना प्रमुख संघटक योगेश परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष राव कदम यांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा पूजा कदम, पालघर जिल्हा संघटक ज्ञानेश पाटील, उपजिल्हा संघटक निशांत धोत्रे,उपतालुका संघटक केदार मुळे यांच्यासह मनसेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित होते.