महाराष्ट्र

आरोपींना अभय देणा-या सपोनि जोग यांचेवर कारवाई करा अन्यथा अमरण उपोषणाचा इशारा.तुळशी ता.माढा येथी मातंग कुटुबास मारहाण प्रकरण

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

तुळशी ता.माढा येथील मातंग कुटुंबाची जमीन बळकावण्यासाठी त्यातील व्यक्तीला जीवे मारण्याच्या उद्देशाने झालेल्या मारहाणीची तक्रार टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गेल्यानंतर त्यांची तक्रार न घेता आरोपींवर कारवाई करण्याऐवजी त्यांना सहकार्य करूणा-या व पिडीत कुटुंबातील लोकांना उडवाउडवीची उत्तरे देऊन
आरेरवीची भाषा करणारे टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जोग व हवालदार लांडगे यांचेवर कारवाई करावी व या घटनेतील आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा दि.१५ /७/ पासून अमरण उपोषण करण्याचा इशारा बहुजन संघर्ष समितीचे वतीने गृहमंत्री, पोलिस अधीक्षकाकडे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि तुळशी ता.माढा येथील जातीवादी गावगुडं सुभाष रामाहरी खांडेकर व भिमराव दादाहरी खांडेकर यांनी दि.२/७ रोजी मांतग समाजातील येथील सत्यवान रामा लोखडे यास जमीन बळकवण्याच्या उद्देशाने जातीवादी मानसिकतेतून त्यांना व त्यांचे कुटूंबाला तेथे राहूच दयाचे नाही या हेतूने जिवास धोक्यास व इतर शारीरी ठिकाणी जबर मारहाण केली व त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. व त्याच्या व कुटूंबांच्या जिवीतास धोका निर्माण केला होता.त्याची तक्रार देण्यासाठी दि.४रोजी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरीश जोग व पोलीस हवालदार राजेश लांडगे यांनी फिर्यादीची तक्रार दाखल करून न घेता आरोपींबरोबर झालेल्या अ‌र्थिक देवाणघेवाणीतून आरोपींची बाजू घेऊन फिर्यिदींनाच आम्ही तक्रार घेऊ शकत नाही असे म्हणत धमकावले आहे यामुळे पिडीत कुटुंब भयभीत झाले असून याप्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करवाई करावी व आरोपींना सहकार्य करणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षक गिरीश जोग व पोलिस हवालदार राजेश लांडगे यांचेवर कारवाई करावी अन्यथा १५/७ पासून टेंभुर्णी पोलिस स्टेशन समोर अमरण उपोषण करण्याचा इशारा बहुजन संघर्ष समितीचे नागनाथ वाघमारे आणि विलास कांबळे यांनी कोल्हापूर परीकक्षेत्राचे पोलिस अधिकारी तसेच सोलापूर ग्रामीण चे पोलिस अधीक्षक,करमाळा विभागाचे पोलिस अधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button