महाराष्ट्र

श्री संत दानाप्पा महाराज यांचा भंडारा भारुडाच्या जुगलबंदीने उत्साहात साजरा.

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल -8378076123

पिंपरी बुद्रुक ( ता. इंदापूर ) येथे सालाबाद परंपरेप्रमाणे श्री संत दानाप्पा महाराज यांचा भंडारा वारकरी व भाविकांच्या उपस्थितीत भारुडाच्या जुगलबंदीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावातील भजनी मंडळ व ग्रामस्थांनी ग्यानबा तुकारामच्या जयघोषात पालखीने ग्राम प्रदक्षिणा घालण्यात आली.

पालखीची ठिक ठिकाणी पूजाकरुन दर्शन घेण्यात आले. ग्रामस्थांच्या वतीने भाविकांना नाष्टा व महाप्रसाद देण्यात आला. दिंडी सोहळ्याच्या पालखीचा विसावा आई तुळजाभवानी मंदिराच्या समोर झाला. यावेळी भारुड सम्राट दिनकर आवताडे महाराज, तानाजी मदने महाराज पुळुज, गवळी महाराज मंगळवेढा या भारुड सम्राटांचा जुगलबंदी सामना जोरदार रंगल्याने उपस्थित वारकरी व भाविक भक्तांचे मनोरंजन झाले.

पालखीची दिंडी प्रदक्षिणानंतर विठ्ठल मंदिरामध्ये पालखी आल्यानंतर हभप राम महाराज शेळके यांचे काल्याची कीर्तन सेवा संपन्न झाली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होऊन दानाप्पा महाराजांच्या भंडाऱ्याची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button