सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून जलसार ग्रामपंचायत हद्दीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपक्रम

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
सफाळे भागातील जलसार ग्रामपंचायतीच्या हद्दीत ग्रामस्थांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण गावात ग्रामपंचायतीच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत . सध्या या गावाची लोकसंख्या पाच हजाराच्या आसपास आहे. सध्या हा गाव विकास कामांच्या प्रगतीपथावर असून या गावाच्या हद्दीतून मुंबई गुजरात महामार्ग वाहतूकीला जोडणारी सुसज्ज जेटी, आणि केंद्र सरकारचा जलदगती बुलेट ट्रेन सारखे देश विकास हित प्रकल्प राबवले जात असल्या कारणामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या संपूर्ण गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
या उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक आणि पालघर लोकसभा खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले.
पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिम भागातील जलसार ग्रामपंचायतीच्या हद्दीत ग्रामपंचायत कार्यालय, किरईपाडा, चिखलपाडा स्टॉप या ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण गावात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे महिलांची आणि मुलींची छेडछाड आला बसणार असून गावातल्या वाहतुकीच्या रस्त्यावर होणारे अपघात, वाद विवाह, भांडण तंटे कॅमेऱ्यात कैद होतील यामुळे एक प्रकारे पोलीस प्रशासनाला मदत होणार असल्यामुळे पुराव्यांच्या आणि सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून जलसार ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच साक्षी गावड, उपसरपंच विंकोश म्हात्रे आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी या गावात राबवलेल्या या उपक्रमाचे संपूर्ण परिसरात कौतुक केले जात आहे.



