महागाव शहरात वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

प्रतिनिधी:- मायाताई सागर पाईकराव यवतमाळ
महाराष्ट्र राज्याचे सलग ११ वर्ष मुख्यमंत्री पद भूषविणारे,हरित क्रांतीचे प्रणेते,पंचायत राजचे जनक,आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार,
धवल क्रांतीचे जनक,कृषी विद्यापीठाचे जनक,
मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देणारे,आदरणीय वसंतरावजी नाईक साहेब यांना महागाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक लोकप्रतिनिधी व बंजारा बांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात आले

तर उपस्थित प्रमुख मान्यवरांनी वसंतराव नाईक साहेब यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला व उपस्थित समाज बांधवांना योग्य मार्गदर्शन केले,
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बंजारा वसाहतिचे नायक हिरासिंगजी चव्हाण सर तर प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा माजी जि प सदस्य डॉक्टर बी एन चव्हाण,रामरावजी पाटील नरवाडे गटनेते न. प.महागाव,बाबुलाल राठोड कारभारी महागाव,सुरेश पाटील नरवाडे,उपाध्यक्ष न. प. गजानन वाघमारे दै सकाळ,रामभाऊ तंबाखे, प्रमोद भरवाडे,आरोग्य सभापती,नगरसेविका इंगोलेताई,डॉ पंजाबराव राठोड,विजय जाधव,महेंद्र कावळे सर माणिक राठोड,ऍड रविंद्र जाधव,गोर बाळूभाऊ राठोड,पवन रावते दैनिक देशोन्नती,सुनिल भाऊ भरवाडे,संजय विजय नरवाडे,मंगल महाराज,दिलीप जाधव,भारत जाधव सर, धर्मा राठोड,पंडीत राठोड,संतोष पवार,अंकुश आडे,आडेभाऊ बेलदरी,गजानन जाधव,इत्यादी मान्यवर उपस्थित होते…

कार्यक्रमाचे संचालन शंकर चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन शिवसेना तालुका प्रमुख तथा माजी नगरसेवक राजू राठोड यांनी केले.कार्यक्रम यशस्वी ते करिता नितीन पवार सर,बाळू चव्हाण,संतोष राठोड,देवानंद राठोड,मनोज राठोड,अतुल राठोड,राम राठोड,ओम राठोड,कृष्णा राठोड,किशोर राठोड,सतीश जाधव,जय जाधव,गजानन राठोड,अरुण चव्हाण,ज्ञानेश्वर आडे,देविदास जाधव, सचिन सगणे,आकाश राठोड यांनी परिश्रम घेतले.