महाराष्ट्र

संग्राम नगर येथील.जयसिंह मोहिते-पाटील विद्यालयांमध्ये रत्नाई पुरस्कार सोहळा संपन्न

उपसंपादक ———हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

दिनांक. 28/06/2023 रोजी श्रीमती. रत्नप्रभादेवी मोहिते- पाटील यांच्या 21व्या पुण्यस्मरणा निमित्त .जयसिंह मोहिते- पाटील विद्यालय व प्राथमिक विभाग संग्रामनगर या प्रशालेमध्ये रत्नाई पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते

प्रथम श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील उर्फ आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले नंतर त्यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संग्रामनगर चे प्रथम नागरिक संग्रामनगर ग्रामपंचायत चे सरपंच अजित रेवंडे हे होते तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशाला समितीच्या सभापती निशा गिरमे मॅडम ह्या होत्या

व प्रमुख उपस्थिती म्हणून प्रशाला समिती सदस्य महादेवराव अंधारे व प्रशाला समिती सदस्य यशवंतराव साळुंखे हे उपस्थित होते प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षक यांची श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या जीवन प्रवासावरती भाषणे झाली त्यानंतर कार्यक्रमाच्या मान्यवरांच्या हस्ते प्रशालेमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या माता पालकांना रत्नाई पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

त्यामध्ये इयत्ता छोटा गटांमध्ये चि. वेदांत निलेश घोडके व श्रीमती. छाया मधुकर घोडके मोठा गट चि. यशवर्धन मिलिंद काळे व सौ.रागिनी मिलिंद काळे इयत्ता पहिली मधून कु.आलिया जावेद शेख व सौ.खुशनुमा जावेद शेख व चि.सोहम गणेश पवार व सौ.सुनीता गणेश पवार इयत्ता दुसरी मधून चि. समर्थ किरण काळे व सौ.प्रतीक्षा किरण काळे इयत्ता तिसरी मधून कु. ज्ञानेश्वरी विक्रम उबाळे व सौ.रूपाली विक्रम उबाळे इयत्ता चौथी मधून कु.निशिगंधा गणेश तोरस्कर व सौ.अनिता गणेश तोरस्कार इयत्ता पाचवी मधून कु.इशिका सुनील दळवी व सौ.स्वाती सुनील दळवी इयत्ता सहावी मधून कु. श्रेया बजरंग क्षीरसागर व सौ. सिंधू बजरंग क्षीरसागर इयत्ता सातवी मधून कु.अनुष्का गौरीशंकर मगर व उषा गौरीशंकर मगर इयत्ता आठवी मधून कु.हिंदवी राजेंद्र शिंदे व शोभा राजेंद्र शिंदे

इयत्ता नववी मधून कु. कल्याणी अंकुश शिंदे व सौ. सोनाली अंकुश शिंदे इयत्ता दहावी मधून प्रथम.कु. मयुरी रामचंद्र अनपट व सौ.सुजाता रामचंद्र अनपट व व्दितीय.कु. नुपूर संदीप शिंदे व सौ. सरिता संदीप शिंदे व तृतीय.चि. संगम रमेश भारती व सौ.सुमित्रा रमेश भारती तसेच लक्ष्मी टाकळी कला महोत्सव मधील रांगोळी स्पर्धेमध्ये प्रशालेतील कु. संतोषी सोमनाथ नरवडे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल तसेच प्रशालेमध्ये इयत्ता मधून प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थी व त्यांच्या माता पालकांना रत्नाई पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

प्रशाला समिती सदस्य महादेवराव अंधारे यांनी आक्कासाहेबांच्या जीवन प्रवासावरती आपले विचार व्यक्त केले तसेच अध्यक्ष भाषणांमध्ये निशा गिरमे मॅडम यांनी दातृत्व व कर्तृत्व याचा सुरेख संगम म्हणजे स्वर्गीय आक्का साहेब आक्कासाहेबांचे गुण सर्व विद्यार्थ्यांनी अंगीकारावे तसेच त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे आपले अध्यक्षीय भाषणांमध्ये निशा गिरमे मॅडम यांनी सांगितले तसेच प्रशालेतील पेटकर मॅडम यांनी स्व. आक्कासाहेब यांच्या जीवन प्रवासाविषयी आपले विचार व्यक्त केले.

याप्रसंगी संग्रामनगर गावचे प्रथम नागरिक व सरपंच अजित रेवंडे साहेब तसेच प्रशाला समिती सभापती निशा गिरमे मॅडम प्रशाला समिती सदस्य महादेवराव अंधारे प्रशाला समिती सदस्य यशवंतराव साळुंखे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक घुले सर तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक फिरोज तांबोळी सर पूर्व प्राथमिक विभागाच्या विभाग प्रमुख सूर्यवंशी मॅडम व प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व बहुसंख्येने पालक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
06:49