शहर

तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या सुरज कश्यपला शोधण्यात सफाळे पोलिसांना यश

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या सुरज कश्यप या (17) वर्षीय मुलाला शोधण्यात सफाळे पोलिसांना यश आले असून त्याला रविवारी सकाळी सुखरूप पणे त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
इयत्ता सातवीत शिकणाऱ्या राजगुरू हम पंडित विद्यालय सफाळे जिल्हा पालघर येथील सुरज कश्यप हा (17) वर्षीय मुलगा दिनांक 19 जून 25 रोजी संध्याकाळी आपल्या घरातून एकाएकी निघून गेला होता.


याबाबत त्याच्या कुटुंबीयांनी सफाळे पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केल्यावर सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळे पोलिसांनी या मुलाला उत्तर प्रदेश येथील दतीवर गावातून शोधून काढून त्याला सुखरूप पणे रविवार दिनांक 22 जून 2025 रोजी सकाळी 7:30 वाजता त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button