महागांव तहसील कार्यालयात दलालांचा सुळसुळाट.महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षित पणाने जनतेची होत आहे पिळवणूक.

प्रतिनिधी:- मायाताई सागर पाईकराव यवतमाळ
मागिल अनेक वर्षा पासून महागांव तहसील कार्यालय हे प्रशासक या सलाईन वर चालत आले होते. परंतू अनेकांच्या मागणी नंतर आजरोजी तहसीलला कायम स्वरूपी महिला तहसीलदार म्हणून संजिवनी मुपडे ह्या लाभल्या आहेत.यांचे कडून तहसील कार्यालयात लाभार्थ्यांची दलाला मार्फत होणारी पिळवणूक थांबेल अशी अपेक्षा तालुक्यातील जनता करीत आहे.

शहरातील प्रशासकीय इमारती मध्ये एकात्मिक बालविकास प्रकल्प, पाठबंधारे विभाग, कृषी विभाग,भुमि अभिलेख,दुय्यम निबंधक कार्यालयासह तहसील कार्यालय सुध्दा आहेत.या इमारतीत सर्वच स्तरातील कामे होत असल्याने तालुक्यातील शेकडो नागरीक शासकीय कामे,शालेय कामे,शेतकीय कामे,बँक व इतर ही कामे घेऊन येत असतात
तालुक्यातील भोळीभाबडी जनता व लाभार्थी यांना आपण घेऊन आलेल्या कामाची ईतंभुत माहीती नसल्यामुळे दिशाहिन असलेल्या लाभार्थ्यांना प्रवेश दारावर व सेतूच्या दारावर.उभे असलेले डोमकावळे दलाल लाभार्थ्यास गाठून आपल्या विश्वासात घेऊन माझी सर्वांशी ओळख असून मी चुटकीत तुमचे कामा करतो असे भासवून भोळ्याभाबड्या नागरीकांची हजारो रुपयांची लुट करतात.यात संबधीत बाबू,संबधीत साहेब यांचे नावे ही रक्कम घेतली जाते परंतू या विषयी संबधीत कर्मचाऱ्यास तीळ मातर ही भणक नसते तरी पण त्यांच्या नावे चिरीमीरी देली असल्याचे अनेक नागरीका कडून बोलल्याजात आहे.

नव्यानेच रुजू झालेल्या तहसीलदार मँडम यांनी तहसील कार्यालयातील डोमकावळे दलाल व इतरही जे जनतेची लुट करणारे लुटारु यांची सखोल चौकशी करून त्यांचेवर कडक कारवाई करुन शासकीय इमारतीत व्यर्थ वावरण्याची बंदी करावी अशी जनतेची मागणी होत आहे.दलालावर कशा प्रकारे कारवाई करुन जनतेची पिळवणूक थांबवीले जाते हे ही पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे.