सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील हरवलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांच्या पथकाला यश

टाईम्स 9मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील हरवलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात सफाळे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांच्या पथकाला शनिवारी यश आले आहे.
पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिम येथील साईनगर भागात राहणारी एक 13 वर्षाची आणि दुसरी 9 वर्षाची अशा दोन अल्पवयीन मुली शनिवार दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी त्यांच्या घराचा शेजारी खेळत असताना एकाएकी बेपत्ता झाल्या आहेत अशी मिसिंग तक्रार या मुलींच्या कुटुंबीयांनी सफाळे पोलीस ठाण्यात शनिवारी संध्याकाळी दाखल केली होती
या तक्रारीच्या अनुषंगाने या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन सफाळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांनी त्वरित तपासाला सुरुवात केली होती. यावेळी त्यांनी वेगवेगळी पथके तयार करून सफाळे पूर्व पश्चिम या भागात शोध मोहीम राबवली व या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून बघितल्यावर या दोन्ही मुली शनिवार दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी संध्याकाळी मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेन ने त्या आपल्या स्वतःच्या मर्जीने त्यांच्या ग्रँड रोड येथील नातेवाईकांकडे गेल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे.
या दोन्ही मुली सुखरूप पणे असून त्या त्यांच्या मर्जीने त्यांच्या नातेवाईकांकडे गेल्याची त्यांनी कबुली दिली आहे.. मात्र त्यांच्या आई-वडिलांना या मुलींनी त्या ग्रँड रोडला नातेवाईकांकडे जात असल्याची कल्पना न दिल्यामुळे त्यांच्या आई-वडिलांनी सफाळे पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली होती.



