अक्कलकोट शहर बागवान जमात आणि बागवान राहत फाऊंडेशन करणार आमदार सचिन कल्ल्याणशेट्टी यांचा सत्कार…

🎯 बागवान राहत फाऊंडेशन चे संचालक जावेदभाई बागवान यांचे वक्तव्य…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधि,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
महाराष्ट्र राज्य आमदार निवास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अक्कलकोट चे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची निवड करण्यात आली…
महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळाची बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली झाली,या बैठकी मध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची निवड करण्यात आली,या वेळी चंद्रशेखर बावनकुळे, रविंद्र चव्हाण उपस्थित होते…
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची निवड झाल्याने अक्कलकोट येथील बागवान जमियत आणि बागवान राहत फाऊंडेशन,पश्र्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने लवकरच त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राहत फाऊंडेशन चे संचालक जावेदभाई बागवान यांनी सांगितले,ते टाइम्स 9 चे पत्रकार आमीर मोहोळकर यांच्याशी भ्रमण ध्वनी वरून बोलत होते…
पुढे बोलताना जावेदभाई बागवान असे म्हणाले की,अक्कलकोट चे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे नेहमीच मुस्लिम समाजाला सहकार्य करण्याची भावना असते आणि त्यांनी तसे वेळोवेळी दाखवून हि दिले असल्याने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे,येत्या काही दिवसांत त्यांना भेटून सत्कार समारंभाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे हि त्यांनी सांगितले…
या सत्कार सोहळ्यासाठी नुरानी मस्जिद,बागवान गल्ली येथील सर्व समाज बांधवांसह अक्कलकोट येथील मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार असल्याची माहिती हि जावेदभाई बागवान यांनी दिली…



