अकलूज येथील अकलाई आयसीयू अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधील रुग्णालयातील बिलात35,97,302 रु.ची अफरातफर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
अकलूज येथील अकलाई आय सी यु अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या बिलामध्ये तीस लाख 97 हजार 302 रुपयाची केल्याप्रकरणी भावना कैलास पती दुबे उर्फ सणा साहिल शेख राहणार मुलाणी वस्ती माळेवाडी यांनी अफरातफर केल्याप्रकरणी डॉक्टर भूषण भारत वय 36 वर्ष व्यवसाय वैद्यकीय राहणार गांधी चौक अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांनी अकलूज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला असून याबाबत सविस्तर वृत्त असे की
आरोपीत मजकुर हिने वरिल तारखेस वेळी व ठिकाणी अकलाई हॉस्पीटलमध्ये अकौंट विभागामध्ये काम पाहत असताना रुग्णांकडून हॉस्पीटलचे येणारे बिल हे हॉस्पीटल चे बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा अकलुज अकौंट नंबर 60352702161 व सीएसबी बॅक शाखा अकलुज अकौंट नंबर 050904364496195001 वर जमा करुन घेणे आवश्यक असताना तिने आम्हास काहीएक कल्पना न देता ब-याच रुग्णांची बिले त्यांचे वैयक्तिक बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा अकलुज खाते नंबर 25051796936 वर घेतली असल्याचे आढळून आले.
तसेच रोख स्वरुपात आलेली बिले ही हॉस्पीटलचे खात्यामध्ये जमा न करता ते तिने स्वतःकडे ठेवली असून स्वतःच्या खात्यावर तसेच रोख स्वरुपात रकमा स्विकारुन हॉस्पीटलच्या नावाच्या रिसीप्ट दिलेल्या आहेत. फिर्यादीने त्यांचे रेकॉर्ड नुसार खात्री केली असता. आरोपी मजकुर हिने दि 09/07/ 2021 ते दिनांक 28/06/2023 या कालावधील ऑनलाईन स्वरुपातील 20,97,302/(वीस लाख सत्यानव हजार तिनशे दोन) रुपये हॉस्पीटलचे खात्यावर जमा करुन न घेता स्वतःचे वरील अकौंटला जमा करुन घेतले आहेत
व रोख स्वरुपातील अंदाजे 15 लाख रुपये हे त्यांनी हॉस्पीटलचे खात्यावर जमा न करता स्वतःसाठी वापरुन एकुण 35,97,302/(पस्तीस लाख सत्यानव हजार तिनशे दोन) रुपयाचा अपहार केला आहे.म्हणून वगैरे मजकुराची तक्रार आल्याने ती मा.पो नि सो यांचे आदेशान्वये अकलूज पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ४६७/ 2023 भारतीय दंड विधान कलम 408 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून गुन्हा रजिस्टरी दाखल करुन गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि/जाधव सो यांचेकडे दिला आहे म्हणून नोंद झाला असून गुन्हा दाखल वेळ
-दि 29/06/2023 रोजी 14/51 वा



