शहर

सफाळे विकास कृती समितीच्या आमरण उपोषण आंदोलनाला खासदार डॉ.सवरा यांच्या आश्वासनानंतर तात्पुरती स्थगिती..

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकाजवळ असलेले रेल्वे फाटक क्रमांक 42 हे पर्यायी व्यवस्था न करता 31 मार्च 2025 रोजी रेल्वे प्रशासनाने अचानकपणे बंद केले होते. त्यामुळे पादचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या या निर्णयाच्या निषेधार्थ 13 मे पासून सफाळे विकास कृती समितीतर्फे आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. शुक्रवार दिनांक 16 मे रोजी खा. डॉ. हेमंत सवरा यांनी उपोषणस्थळी भेट देवून पर्यायी व्यवस्थेसंदर्भात काही आश्वासने दिल्यानंतर आंदोलकानी तात्पुरती स्थगिती दिली. मात्र दिलेल्या वेळेत मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलन पूर्ववत सुरू करण्यात येईल असा इशाराही कृती समितीकडून देण्यात आला आहे.

सफाळे स्थानकाजवळ असलेले रेल्वे फाटक क्रमांक 42 हे बंद होऊ नये यासाठी कृती समितीतर्फे वेळोवेळी रेल्वे प्रशासन व जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र फक्त आश्वासने देण्यात आली. प्रत्यक्ष कृती काहीच झाली नव्हती.

त्यामुळे 4 एप्रिल 2025 रोजी फाटक बंदीच्या विरोधात कृती समितीने आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी आणि डीआरएम यांनी खा. डॉ. हेमंत सवरा यांच्यासमवेत बैठक घेतली होती. परंतु या बैठकीनंतरही प्रशासनाकडून फक्त आश्वासनेच मिळाली. त्यामुळे समितीने आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला होता. सलग चार दिवस चाललेल्या या आंदोलनास नागरिकांनी वाढता प्रतिसाद दिला होता. यावेळी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण राऊत, कृती समितीचे अध्यक्ष सिकंदर शेख, उपाध्यक्ष नचिकेत पाटील, सचिव स्वप्निल तरे, संतोष घरत, धणेश गावड यांच्यासह पश्चिम भागातील ग्रामपंचायतींचे सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सफाळे विकास कृती समितीच्या आंदोलनामुळे मिळालेल्या सुविधा तसेच आश्वासने…

१.*फाटक लगत पूर्व पश्चिम भुयारी मार्ग पादचाऱ्यासाठी (प्रशासकीय गोष्टी सुरुवात ) टाइमलाइन काही दिवसात जाहीर होईल.
*२ पूर्वेला प्रवाशांसाठी लिफ्ट चे काम त्वरित चालू करून सप्टेंबर महिन्यात चालू करणार.
*३.पूर्वेलाच जिल्हापरिषदच्या जागेचे हस्तांतरणाचा विषय झाला की लगेच सरकता जिना चालू करणार.
*४.पश्चिमेला रेल्वे प्लेटफॉर्म वर सरकता जिना जुलै महिन्यात चालू करणार.
*५.पालघर बाजूला एकदम टोकाला बनवायला लावलेला फुट ओवर ब्रिज फाटका बाजूला सरकवण्या साठी जागेची तपासणी करणार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button