शहर

मानव आणि परिसर विकास समिती शेड विराथन बुद्रुक आणि रोशनी प्रोजेक्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्यांचे वाटप

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640

पालघर तालुक्यातील सफाळे पूर्वेकडील केंद्रशाळा पारगावच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमधील गोरगरीब विद्यार्थ्यांना मानव आणि परिसर विकास समिती शेड’ विराथन् बुद्रक( सफाळे)आणि रोशनी प्रोजेक्ट यांच्या संयुक्तविद्यमाने मोफत शैक्षणिक साहीत्यांचे वाटप करण्यात आले.

पूर्वेकडील जिल्हा परिषद शाळा सोनावे, घरत्‌पाडा, बोरीचापाडा, गिराळे, नगावे, खोरीचापाडा, दारशेत, उंवरपाडा, खोनपाडा या शाळांमधील सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, रेनकोड, दप्तर अशा प्रकारचे साहित्य मानव आणि परिसर विकास समिती शेड’ विराथन बुद्रुक व रोशनी प्रोजेक्ट यांच्या संयुक्तविद्यमाने आणि सहकार्याने प्रत्येक शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाकरिता ‘शेड संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तावडे, प्रकल्प अधिकारी स्नेहल साळुंखे, वित्त अधिकारी दिपा दळवी, प्रकल्प समन्वयक राहुल कांबळे, सेंटर इंचार्ज निता म्हात्रे, प्रकल्प समन्वयक तृप्ती पाटील, प्रोजेक्ट मॅनेजर भिमराव घरत, प्रकल्प गाव कार्यकर्ती उज्वला जाधव त्याचप्रमाणे शिक्षक वर्ग आणि पालक मोठ्या उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button