सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालय शंकरनगर अकलूज येथे पदविका अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्राचे उद्घाटन

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मोबाईल 97 30 867 448
अकलूज,शंकरनगर येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते – पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च , शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पदविका अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२३-२४ च्या महाराष्ट्र शासन व तंत्रशिक्षण मंडळ , मुंबई अधिकृत सुविधा केंद्राचे ( FC Center ) उद्घाटन दि . ०३/०६/२०२३ रोजी झाले . सुविधा केंदाचा नंबर FC ६७८२ असा असून सुविधा केंद्रामध्ये प्रथम तसेच थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रकियांसाठी विद्यार्थ्यांना नाव नोंदणी, अर्ज नोंदणी व निश्चिती करता येणार आहे . सुविधा केंद्र सकाळी ० ९ .३० ते सायंकाळी ०५.३० यावेळेमध्ये सर्व दिवशी चालू राहील , अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . प्रविण ढवळे यांनी दिली . उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . प्रविण ढवळे , कार्यालयीन अधिक्षक शब्बीर शेख , सुविधा केंद्रप्रमुख प्रा . स्वप्नील निकम व प्रा . गौरव फडे तसेच सर्व विभागाचे विभागप्रमुख , शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी व पालक उपस्थित होते .

ग्रामीण भागातील विद्यार्थी तसेच पालकांना पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे अनेकदा पालकांचे निर्णय चुकतात . तरी ग्रामीण भागातील पालक तसेच विद्यार्थ्यांना पदविका अभियांत्रिकीच्या प्रवेशाबद्दल पुर्ण माहिती मिळावी या हेतूने महाविद्यालयामध्ये मोफत समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे . तरी अकलूज व परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे अवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . प्रविण ढवळे यांनी केलेले आहे .
डॉ . प्रविण ढवळे प्राचार्य
सहकार महर्षी शंकरराव माहिते – पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च , शंकरनगर – अकलूज .



